🌟भर उन्हाळ्यात अवकाळी पावसासह गारपीट : व्यापारी प्रश्नार्थक मुद्रेत कुलर विकावे की छत्री ?


🌟पुर्णेतील व्यापारी निसर्गाच्या मनमानी बदलामुळे दुविधा मनस्थितीत कुलर/पंखे/एसी खरेदीदारांनी तोंड फिरवले🌟


✍🏻वृत्त विशेष - चौधरी दिनेश (रणजीत)

नैसर्गिक परिस्थितीत कमालीचा बदल झाल्यामुळे इलेक्ट्रिक साहित्य विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून भर उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातल्यामुळे उन्हाळ्यात विक्री होणारी थंड हवेची उपकरण सिलिंग फॅन/टेबल फॅनसह कुलर/एसीकडे ग्राहकांनी अक्षरशः पाठ फिरवल्यामुळे व्यापारपेठेतील व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कोट्यावधी रुपयांचा माल धुळ खात पडल्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.


पुर्णा शहरात तब्बल ४० ते ४५ इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्सची दूकान असून यातील बहुसंख्य दुकानदारांनी उन्हाळ्याची चाहूल लागताच आपआपल्या दुकानांमध्ये सिलिंग फॅन/टेबल फॅनसह कुलर/एसी आदी उपकरणांचा लाखों रुपयांचा माल विक्रीसाठी भरला खरा परंतु निसर्गाने आपले रंगच बदलल्यामुळे या बिचाऱ्या दुकानदारांना झालेल्या मनस्तापामुळे अक्षरशः डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आल्याचे दिसून येत असून सकाळी थंडी दुपारी गरमी अन् रात्री वादळीवारा अवकाळी पाऊसासह गारपीट होत असल्यामुळे सिलिंग फॅन/टेबल फॅनसह कुलर/एसी आदी उपकरणांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी इलेक्ट्रिक दुकानांकडे पाठ फिरवल्यामुळे इलेक्ट्रिक दुकानदार अक्षरशः दिवसभरषग्राहकांची वाट पाहतांना दिसून येत आहेत.


पुर्णा शहरात सिलिंग फॅन/टेबल फॅनसह कुलर/एसी आदी उपकरणांची मागील वर्षाच्या तुलनेत २५% सुध्दा विक्री झाली नसल्यामुळे इलेक्ट्रिक दुकानदार आणलेला माल विक्री झाला नाही पावसाळ्यात या मालाची खरेदी करणार तरी कोण ? अश्या प्रश्नार्थक मुद्रेत चिंताग्रस्त झाल्याचे निदर्शनास येत असून भर उन्हाळ्यात जोरदार अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने सिलिंग फॅन/टेबल फॅनसह कुलर/एसी आदी उपकरणांची विक्री करावी की पावसाळी छत्र्यांची अश्या दुविधेत असल्याचे दिसत आहे...... 


🌟व्यापारपेठेवर अगोदरच मंदिचे सावट अन् त्यातच निसर्गाची अवकृपा व्यापाऱ्यांनी शेवटी करावे तरी काय ? - रामा पारवे


पुर्णेतील व्यापारपेठेवर अगोदरच मंदिचे सावट अन् त्यातच निसर्गाची अशी अवकृपा मग शेवटी व्यापाऱ्यांनी करावे तरी काय ? असा प्रश्न शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा शिवकृपा इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्सचे मालक रामा पारवे यांनी उपस्थित केला असून ते यावेळी बोलतांना म्हणाले की सिलिंग फॅन/टेबल फॅनसह कुलर/एसी आदी उपकरणांचे भाव सातत्याने वाढत असून वाढीव दरातही आम्ही मोठ्या प्रमाणात सिलिंग फॅन/टेबल फॅनसह कुलर/एसी आदी उपकरणांची खरेदी केली खरी परंतु भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीला सुरुवात झाल्यामुळे या उपकरणांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी इलेक्ट्रिक दुकानांकडे पाठ फिरवल्यामुळे इलेक्ट्रिक दुकानदारांनी खरेदी केलेली लाखो रुपयांची सिलिंग फॅन/टेबल फॅनसह कुलर/एसी आदी उपकरण अक्षरशः दुकानदारांसाठी ओझ्याला काळ ठरत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या