🌟पुर्णेचे तहसिलदार माधवराव बोथीकरांचा बोथट कारभार ? पुर्णा-गोदावरी नदीपात्रात रेती तस्करांचा मुक्तसंचार...!

🌟तालुक्यात असंख्य वाहनांसह शेकडो गाडवांच्या खांद्यावर चोरट्या रेतीचा प्रचंड भार ? महसुल प्रशासनातील शोधणार हो कोण गद्दार🌟


✍🏻'परखड सत्य' :- चौधरी दिनेश 

पुर्णा (दि.२६ मे २०२३) - महाराष्ट्र शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसुल बुडवून शासकीय गौण-खनिज रेतीचे प्रचंड प्रमाणात बेकायदेशीररित्या जेसीबी यंत्रांसह तराफ्यांच्या सहाय्याने उत्खनन करून त्या अवैध चोरट्या रृवरेतीची असंख्य  टिप्पर/हायवा/ट्रॅक्टरसह शेकडो गाढवांच्या सहाय्याने तस्करी होत असतांना स्थानिक तहसिलदारांसह महसुल प्रशासन आपल्या कर्तव्यासह जवाबदारीचे देखील भान न ठेवता झारीतील शुक्राचार्या प्रमाणे अवैध गौण खनिज रेती/मुरुम/माती/दगड गिट्टी संघटीत तस्करांच्या टोळक्यांना मोहमायेचा हात देऊन शासकीय संपत्तीची अक्षरशः लुटमार करण्याची संधी देत आहे की काय ? असा गंभीर प्रश्न पुर्णा तालुक्यात सर्वत्र उपस्थित होतांना दिसत आहे.


पुर्णा तालुक्यातून वाहणाऱ्या पुर्णा-गोदावरी या प्रमुख नद्यांमुळे हा तालुका एकेकाळी परभणी-हिंगोली या दोन जिल्ह्यात कृषी प्रधान तालुका म्हणून ओळखला जात होता परंतु या पुर्णा-गोदावरी नद्यांच्या पात्रांतील गौण खनिज रेती साठ्यांवर जेव्हा संपूर्ण मराठवाड्यातील गौण खनिज रेती तस्कर माफियांची वक्रदृष्टी पडण्यास सुरूवात झाली आणि असंख्य रेती तस्कर टोळ्यांनी गाव खेड्यांतील स्थानिक भ्रष्ट लोकप्रतिनिधीं/ग्रामसेवक यांच्यासह महसुल प्रशासनातल्या झारीतील शुक्राचार्यांना हाताशी धरून पुर्णा गोदावरी पात्रांना जेसीबी यंत्रांसह तराफ्यांच्या साहाय्याने ओरबडण्यास सुरुवात केल्यामुळे कृषी उद्योगासह पर्यावरणाची देखील प्रचंड हाणी होण्यास सुरुवात झाली.


पुर्णा तालुक्यातील पुर्णेसह मौ.कानडखेड,कान्हेगाव,निळा,माटेगाव,धनगर टाकळी,कंठेश्वर,सारंगी,पिंपळगाव,गंगाजीबापू,वजूर आदींसह अनेक गावांतून वाहणाऱ्या नदीपात्रांवर अवैध रेती तस्कर माफियांच्या संघटीत टोळ्यांनी जेसीबी यंत्रांसह तराफ्यांच्या साहाय्याने प्रचंड प्रमाणात राजरोसपणे रात्रंदिवस प्रचंड प्रमाणात अवैध रेती उत्खननासह या चोरट्या रेती साठ्यांची असंख्य टिप्पर/हायवा/ट्रॅक्टरसह शेकडो गाढवांच्या सहाय्याने तस्करी संपूर्ण जिल्ह्यांसह मराठवाड्यातील परभणी/हिंगोली/वाशिम/नांदेड/लातूर जिल्ह्यांमध्ये देखील तस्करीसह शासकीय विकासकामांचे गुत्तेदार,बांधकाम व्यवसायिक तसेच निवासस्थानांची बांधकाम करणाऱ्या बांधकाम धारकांना तिन ब्रासच्या एका टिप्पराला १२ ते १४ हजार रुपयांना विक्री केले जात असल्यामुळे पुर्णा-गोदावरी नदीपात्रातून प्रत्येक दिवसभरात लाखों रुपयांचे शासकीय गौण खनिज रेतीची खुलेआमचोरी होत असतांना तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्यास महसुल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी कागदी गांधीगिरीत मग्न आहेत की काय ? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच म्हणावे लागेल......





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या