🌟अन् त्या अन्नदात्या शेतकऱ्याच्या अश्रूंचा बांध फुटला : वादळी वारा अवकाळी पाऊस अन् गारपीमुळे टरबूज पिकाचे मोठे नुकसान.....!


🌟पुर्णा तालुक्यातील सातेगाव येथील शेतकरी डिगांबर ठाकूर यांच्या शेतातील दिड दोन लाखांच्या टरबूजावर निसर्गाच घाला🌟

पुर्णा (दि.०१ मे २०२३) - पुर्णा तालुक्यात झालेल्या वादळीवारा अवकाळी पाऊस आणि गारपीटीने अनेक अन्नदाता शेतकऱ्यांवर अक्षरशः अश्रू ढाळण्याची वेळ आणल्याचे हृदयविदारक चित्र पाहावयास मिळत असून शेतकऱ्यांचा हातातोंडाला आलेला घास निर्दयी निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे या शेतकऱ्यांवर आपल्या अपेक्षांना मुठमाती देण्याची वेळ आल्याचे पाहावयास मिळत आहे.


पुर्णा तालुक्यात झालेल्या वादळीवारा अवकाळी पाऊस अन् गारपीटीमुळे अन्नदाता शेतकऱ्यांच्या शेतातील जवारी,हळद,भुईमुग भाजीपाला पिकांतील वांगे गोबी टोमाटो मिरची कांदे,पालक मेथी शेपू भेंडी भोपळा आदीसह केळी,आंबा,संत्रा,मोसंबी,चिक्कू टरबूज,खरबूज आदी बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान असून तालुक्यात दि.२६/२७ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस गारपिटीने सातेगाव येथील शेतकरी डिगांबर नारायण ठाकुर यांच्या गट क्रमांक ५२ या शेतातील टरबूज पिकासह ज्वारी,कांदा उस आदी पिकांची प्रचंड प्रमाणात नासधूस झाली असून अंदाजे दिड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तर याच गावातील प्रकाश नागोराव शिवनखेडे यांची सुद्धा गट क्रमांक ३९ या शेतातील मध्ये टरबूज व आबां आदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांच्या अश्रूंचा अक्षरशः बांध फुटला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या