🌟परभणीत आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे रविवार दि.१४ मे रोजी अमृतवाणीचे आयोजन.....!


🌟आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अमोलदादा वागळे यांची प्रमुख उपस्थिती🌟

परभणी (दि.१२ मे २०२३) : प.पू. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्ताने रविवार १४ मे २०२३ रोजी अमृतवाणी हा सत्संग व ज्ञान चर्चाचा कार्यक्रम परभणीत आयोजित करण्यात आला असून यास आर्ट ऑफ लिव्हिंगचे आंतरराष्ट्रीय व वरिष्ठ प्रशिक्षक अमोलदादा वागळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

             वसमत रस्त्यावरील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर रविवार १४ मे रोजी सायंकाळी ०७-०० वाजता या अमृतवाणी सत्संग व ज्ञानचर्चेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आर्ट ऑफ लिंव्हिंग परिवाराने केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या