🌟आर्ट ऑफ लिव्हिंग : सर्वांच्या चेहर्‍यांवर आनंद दिसावा यासाठीचे कार्य.....!


🌟विश्‍वविख्यात संत प पु श्री श्री रविशंकरजी गुरुजी याच्या वाढदिवसा निमित्त हा विशेष लेख🌟

       आपल्या परभणी नगरीमध्ये विश्‍वविख्यात संत प पु श्री श्री रविशंकरजी गुरुजी याच्या वाढदिवसानिमित्त आज रविवार दि.14 मे 2023 रोजी अमृतवाणी व सत्संग शिवाजी कॉलेज मैदान परभणी येथे आयोजित केला आहे. या निमित्ताने हा लेख....

       प.पू. श्री श्री रविशंकरजी यांचा जन्म 13 मे 1956 ला तामिळनाडू राज्यात पापनाशम या गावी झाला असून त्यांनी त्याचे शिक्षण व वेदशास्त्राचा अभ्यास करुन त्यांनी त्यांच्या कार्यास सुरुवात केली प पु गुरुजी यांनी सर्व जगभर शातता प्रस्थापित करण्यासाठी व्यक्ती विकास केंद्र बेंगलोर या संस्थेची स्थापना करुन कार्यारंभ केलेला आहे. आजपर्यंत जगातील 190 देशामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहे गुरुजींचा मुख्य उद्देश असा आहे की या विश्वातील प्रत्येक व्यक्ती आनंदी जीवन जगली पाहिजे गुरुजींना आजपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर याच कार्यामुळे उच्च दर्जाचे अनेक देशाने पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे तसेच वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठानी डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलेले आहे भारतामध्ये सुध्दा सर्व धर्माना एकमेकाचा आदर करुन आनंदाने जगता यावे यासाठी विविध धर्माचे समेलने आयोजित करून सर्व धर्माचा सन्मान वाढवलेला आहे विशेष बाब म्हणजे हे सर्व करत असताना गुरुजींनी महिलासाठी विशेष लक्ष देऊन महिलांचे सुध्दा समेलने आयोजित करुन त्याच्यातील नेतृत्व गुण व त्याचे ज्ञान समाज आणि देशास कसे उपयुक्त होईल यासाठी कार्य केलेले आहे. वरील सामाजिक कार्यामुळे भारत सरकारने पद्मविभूषण उपाधीने सन्मानित केले आहे.

         सुदर्शन क्रिया हे तत्र गुरुजींनी मानव जातीस दिलेली एक अनमोल भेट आहे प्रत्येक व्यक्ती ही सुदर्शन क्रिया करून तणावमुक्त होऊन सुखी व आनंदी होऊ शकतो गुरुजींना सुदर्शन क्रिया 1982 साली दहा दिवस मौन अवस्थेत असताना कर्नाटक राज्यातील शिमोघा या गावी प्राप्त झालेली आहे यापूर्वी या क्रियेचा कोणत्याही शास्त्रात अथवा कोठेही उल्लेख नाही या सुदर्शन क्रियेस जागतिक आरोग्य संघटनेने सुध्दा मानव जातीस ही क्रिया उपयुक्त आहे असे सांगून सन्मानित केलेले आहे या सुदर्शन क्रियेचे पेटट फक्त आर्ट ऑफ लिव्हिंगलाच आहे या सुदर्शन क्रियेच्या नियमित सरावाने प्रत्येक व्यक्ती उर्जावान बनतो त्याची कार्यक्षमता वाढते, त्यांच्या कामाचा दर्जा सुधारतो व मन शांत राहते त्यामुळेच मनुष्य शांत आणि सुखी होऊ शकतो.

         आज मानवाने खूप प्रगती केली आहे विज्ञानाच्या साह्याने आर्यमान वाढले आहे जीवन सुविधामुळे खूपच सुखकर झालेले आहे. इंटरनेट, मोबाईल इ. जग आपल्या कवच आलेले आहे हे सर्व घडूनही आम्ही मात्र आतून नेहमीच अस्वस्थ तणावग्रस्त जीवन जगत असतो आजार आर्थिक सकटे, जातीय वैमानस्य याही बाबी वाढत आहेत यावर उपाय म्हणून विश्वविख्यात श्री श्री रविशंकरजी मागील अनेक वर्षांपासून दि आर्ट ऑफ गुरु लिव्हिंगच्या माध्यमातून जगभर आमच्या सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद दिसावा यासाठी कार्य करत आहेत.

         मानवास सर्व परिस्थितीमध्ये अतिशय शांत व संयमाने कसे जगता येईल व आपले जीवन उत्कर्षमय करता येईल यासाठी पपू गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वेगवेगळ्या कोर्सेस मार्फत तरुण पिढी घडवण्याचे कार्य करते तसेच वयाच्या 5 ते 10 वर्षापर्यंतच्या लहान मुलांनादेखील प्रज्ञायोगाच्या मार्फत ताणतणाव कमी करून आनंदी व उत्कर्षमय जीवन जगण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

         मानवी मनाचा विचार केला असता मन आमच्या नियंत्रणात न राहता ते नेहमी नकारात्मक गोष्टी पकडून ठेवते ज्यामुळे आमचा ताण तणाव वाढतो ज्याचा परिणाम आरोग्यावर व कार्यक्षमतेवर सुद्धा होतो म्हणून आर्ट ऑफ लिविंग मध्ये मनावर नियंत्रण ठेवून ताण तणाव कमी कसा करता येतो हे शिकवले जाते याचा अनुभव कोट्यावधी लोकानी घेतलेला आहे मन वर्तमानात ठेवले की ताण तणाव कमी होतो हे मन वर्तमानात राहावे यासाठी ध्यान प्राणायाम सत्संग याचा उपयोग होतो आपणासही या अनुभवाचा लाभ मिळावा यासाठी आर्ट ऑफ लिविंग परिवार परभणी यांच्यावर यांच्यावतीने दिनांक 14 में 2023 रोजी शिवाजी महाविद्यालय प्रागणात सध्याकाळी 07:00 वाजता विश्वविख्यात परमपूज्य श्री श्री रविशंकर यांचे आवडते शिष्य श्री अमोल दादा वागळे यांच्या अमोघ वाणीतून अमृतवाणी व सत्संग याचा सर्व परभणीकरांनी लाभ घ्यावा ही विनंती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या