🌟पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या अकार्यक्षम व निर्लज्ज कारभारामुळे संपूर्ण शहर अस्वच्छतेच्या विळख्यात....!


🌟नगर परिषदेतील प्रभारी अधिकाऱ्यांचा कारभार ठरतोय अस्वच्छतेसह भ्रष्टाचारात भारी : घान कचऱ्यांची ढिगार दारोदारी 🌟


पुर्णा (दि.०५ मे २०२३) - पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी लोमटे प्रभारी...नगर अभियंता सिध्दार्थ गायकवाड प्रभारी...लेखापाल प्रकाश कुंभार प्रभारी...शहरातील प्रत्येक प्रभागांसह मुख्य बाजारपेठेत घाण कचऱ्यांची ढिगार दारोदारी...शहरातील नागरिक म्हणताय 'कावळा केला कारभारी अन् घाण कचऱ्यासह विष्टा आली घरपरत दारोदारी' एकंदर अश्या प्रकारची दुर्दैवी अवस्था शहरात सर्वत्र पाहावयास मिळत असून पुर्व मुख्याधिकारी अजय नरळे यांची दि.१७ एप्रिल २०२३ रोजी चाकूरला बदली झाल्यानंतर नगर परिषदे प्रभारी मुख्याधिकारी लोमटे यांना पदभार देण्यात आला त्यांनी पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर नगर परिषद कार्यालयात आतापर्यंत मोजून केवळ तिन वेळेसच हजर झाले त्यात पदभार स्विकारतांना प्रथमतः स्वाक्षरी मारण्यासाठी त्यानंतर महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ०१ मे २०२३ रोजी झेंडावंदनासाठी यानंतर काल गुरुवार दि.०४ मे २०२३ रोजी शहरातील बोगस व निकृष्ट दर्जाची कामांची पाहणी करुन भ्रष्ट गुत्तेदारीला जणूकाही हिरवा कंदील दाखवला की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


पुर्णा शहरातील विविध प्रभागांसह शहरातील मुख्य बाजारपेठेत देखील विकासकामांच्या नावावर अत्यंत निकृष्ट दर्जाची सिमेट रस्ते नाल्यांची बांधकाम अवकाळी पावसात देखील कुठलाही विचार नकरता केली जात असतांना या कामांची पाहणी करीत शहरात फिरत असतांना प्रभारी मुख्याधिकारी लोमटे यांना शहरात सर्वत्र तुंबलेल्या नाल्यांतील रस्त्यांवर वाहणारे गलिच्छ पाणी,जागोजाग निर्माण झालेले घाण कचऱ्यांचे ढिगार निदर्शनास आली नसतील काय ? 


असा प्रश्न उपस्थित होत असून शहरातील विविध भागांमधील विकासकामांची पाहणी करीत असतांना प्रभारी मुख्याधिकारी लोमटे यांची अवस्था धृतराष्ट्रा प्रमाणे तर झाली नव्हती ना ? शहरातील पोलिस स्थानक परिसर,पोस्ट कार्यालय परिसर,अशोक रोड परिसरातील समता शाळा परिसर,मस्तान पुरा नवी आबादी परिसरासह जिल्हा परिषद कन्या शाळा परिसर,गवळी गल्लीसह पोलिस वसाहत परिसर,अजिज नगर परिसर,लोकमान्य टिळक रोड/दत्त मंदिर परिसर,स्वामी दयानंद सरस्वती चौक परिसर,डोबी गल्ली,कोळीवाडा,अण्णाभाऊ साठे नगर,धनगर वाडा,कुंभार गल्ली,कुरेशी मोहल्ला परिसर या सर्वच परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्यामुळे सर्वत्र डासांचे प्रमाण वाढल्यामुळे मलेरीया,टायफाईड,डेंग्यू,कावीळसह विविध साथीच्या रोगांचे प्रमाण वाढण्याची भिती निर्माण झाली असतांना नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी लोमटे मात्र उंटावरून म्हशी दामटल्यागट वागत असल्याने पुर्णा नगर परिषदेचा कारभार निराधार झाल्याचे दिसत असून शहरात स्वच्छते अभावी साथीच्या रोगाचे प्रमाण वाढल्यास यास सर्वस्वी नगर परिषद प्रशासनच जवाबदार राहणार आहे........टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या