🌟परभणी येथे हरिनाम बैठक परिवाराच्या वतीने बुद्ध पोर्णिमेचा कार्यक्रम संपन्न.....!


🌟कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बोद्ध साहित्याचे अभ्यासक सेलू वरुन तुकाराम मगर उपस्थित होते🌟

परभणी (दि.०५ मे २०२३) - परभणी येथील उघडा महादेव परिसरात आज शुक्रवार दि.०५ मे २०२३ रोजी एम.बी.नरसाळे यांच्या हॉलवर बुद्ध पोर्णीमेचा कार्यक्रम संपन्न झाला.तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाखी पोर्णीमेचा , त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ती वैशाखी पोर्णीमेलाच आणि त्यांचे महापरिनिर्वाण देखील वैशाखी पोर्णीमेचेच.म्हणून ही अत्यंत महत्व असनानी वैशाखी पोर्णीमा वारकरी मंडळीनी आज साजरी केली. 

या कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठलाच्या पुजनाने झाली.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बोद्ध साहित्याचे अभ्यासक सेलू वरुन तुकाराम मगर उपस्थित होते.कार्यक्रमास  प्रमुख पाहुणे म्हणून सेलू येथील नुतन महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र शिंदे उपस्थित होते.कार्यक्रमाची अध्यक्षता सेवा निवृत्त तहसीलदार एन.जी.खंदारे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांनी केले तर प्रास्ताविक भाऊराव बेंडे यांनी केले. 

तुकाराम मगर बोलताना म्हनाले की वारकरी संत चळवळीचे मॉडेल हे बुद्धाच्या तत्वज्ञानातूनच आलेले आहे. त्रिपीटके आणि बुद्ध तत्वज्ञान वाचल्यानंतर तुम्हाला संत एकनाथ महाराज , संत ज्ञानेश्वर महाराज , संत नामदेव महाराज आणि संत तुकोबाराय यांच्या अभंग गाथ्याची संगती लागेल.त्यासाठी सर्व वारकरी किर्तनकार प्रवचनकार यांनी बुद्ध साहित्य वाचावे.असे त्यांनी आवाहन केले त्यासाठी ते पुढील काळात विविध शिबीरे घेनार असल्याचेही म्हनाले या कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प.एकनाथ महाराज भालेराव , ह.भ.प.वैभव महाराज शेटे,एम.बी.नरसाळे,अजीत कदम यांनी केले होते. 

या कार्यक्रमासाठी पुर्णेहून शिवाजी बोबडे , सेलूवरून कॉ रामेश्वर पौळ , प्रकाशक कल्याण गांगुर्डे, जेष्ट साहित्तिक प्रेमानंददादा बनसोडे , ऋजू प्रतिष्ठानचे अमोल लांडगे , स्वराज इंडियाचे डॉ गोविंद कामटे व गोवींद गिरी , डॉ सिध्दार्थ वसेकर , ज्योतीताई वसेकर, सोपान काळे , गोविंद रोकडे , बाळासाहेब दंडवते , बि.एन. इंगोले, डि.के. सारणीकर , ग्यानोजी गायकवाड मंचक पांचाळ आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या