🌟महावितरण कंपनीतील विविध पदांसाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोधी पक्षनेते दानवे यांची घेतली भेट....!


🌟महावितरण मध्ये पद भरतीची जाहिरात लवकर काढण्यात यावी याची केली मागणी🌟


🌟बेरोजगार युवकांचा प्रश्न शासन दरबारी मांडणार - अंबादास दानव

✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर: महावितरण या राज्याच्या शासकीय विद्युत कंपनीत 2015 पासून कोणतीही पद भरती झाली नसल्याने  तसेच वरिष्ठ अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या दोन्ही पदा संदर्भात शासनाने मागील ८ वर्षांत जाहिरात न काढल्याने आपण हा प्रश्न शासन स्तरावर मांडावा व आम्हा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना न्याय द्यावा अशी मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथे महावितरण या शासकीय विद्युत कंपनीच्या नोकरीसाठी तयारी करत असलेल्या युवकांनी केली. विरोधी पक्ष नेते यांच्या कार्यालयीन ठिकाणी भेट घेऊन त्यांनी याबाबतीत निवेदन सादर केले. दानवे यांनी स्वतः हे निवेदन स्वीकारून शासन दरबारी हा प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले.

दानवे यांना माहिती देताना विद्यार्थी म्हणाले की, आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना सुद्धा आमच्या आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने खाजगी सावकाराकडून व विविध बँकांकडून कर्ज काढून आम्हाला इंजीनियरिंग या अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी संभाजीनगर येथे पाठवले होते. आम्ही सर्व शेतकरी, कष्टकरी व वंचित वर्गातून येतो त्यामुळे आमच्या आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा आम्ही महावितरण या कंपनीत नोकरी लागेल या आशेपोटी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याचे धाडस केले. परंतु 2015 पासून म्हणजे मागील आठ वर्षापासून महावितरण या कंपनीने कोणत्याही प्रकारची पद भरती तर केलीच नाही त्या व्यतिरिक्त वरिष्ठ अभियंता या पदाचे ८५० व कनिष्ठ अभियंता ६०० जागा रिक्त अजून सुद्धा पद भरतीची जाहिरात काढली नाहीत. त्यामुळे शिक्षण पूर्ण होऊन दोन - तीन वर्षे झाले आहेत परंतु अजूनही आम्ही बेरोजगार आहोत यामुळे आमच्या वडिलांसह आम्ही नैराश्यात असल्याचे यावेळी या विद्यार्थ्यांनी दानवे यांना सांगितले.तसेच या पदांची शासनाने लवकर जाहिरात काढली नाही तर आमच्याकडे आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी दानवे यांनी या विद्यार्थ्यांचा संवेदनशील प्रश्न समजून घेतला व सर्व ताकदीने हा प्रश्न शासन दरबारी मांडला जाईल याचे आश्वासन दिले. यावेळी विविध शासकीय पदांची भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या