🌟नांदेड येथे आज जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन....!


🌟या दिनाचे औचित्य साधून तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृतीपर चित्रकला स्पर्धा संपन्न🌟

नांदेड (दि. ३१ मे २०२३) :- ३१ मे हा जागतिक तंबाखू नकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने इंडियन डेंटल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दि.३१ मे रोजी सकाळी ६ ते ७ पर्यंत सायकल रॅली व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

या दिनाचे औचित्य साधून तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृतीपर चित्रकला ३० मे रोजी सायं. ५ वाजेपर्यंत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय, वजिराबाद, नांदेड येथे प्रत्यक्ष जमा करावेत. ही सायकल रॅली, प्रभात फेरी व चित्रकला सहभाग सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ३१ मे रोजी सर्व नोंदणीकृत डेंटल क्लिनिक मध्ये तंबाखू व्यसन असलेल्या व्यक्तींसाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे इंडियन डेंटल असोसिएशन अध्यक्ष यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या