🌟लोकांच्या सेवेसाठी तत्पर कार्यरत असणार व्यक्तीमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुलंद तोफ जामिनियाँ कुरेशी.....!


🌟आयुष्यभर एकनिष्ठ नेता संघर्षच त्यांच्या वाट्याला🌟

      राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते आणि ती उणीव भरून काढली आहे राज्याचे माजी मंत्री लोकप्रिय आ. धनंजयजी मुंडे साहेब व वाल्मीक आण्णा कराड यांचे कट्टर खांदे समर्थक जामिनियाँ कुरेशी यांचा आज दि.05 मे 2023 रोजी वाढदिवस त्यानिमित्ताने लेखातून केलेले अभिष्टचिंतन!

   आयुष्यभर एकनिष्ठ नेता संघर्षच त्यांच्या वाट्याला आला. कुठलीही मोठी राजकीय सत्ता नसताना राज्याचे माजी आ. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखालील आणि मार्गदर्शनाखाली जामिनियाँ कुरेशी यांनी राजकीय वलय निमार्ण केले. हालअपेष्ठा, दु:ख, दारिद्रय पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या इच्छा-आकांक्षावर पाणी ओतून येथील लोकांच्या सेवेसाठी तत्पर कार्यरत असतात.सतत प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी आयुष्यभर केली. सर्वांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. 

संस्कारामुळे व आदर्श कौटुंबिक विचारांचा वारसा लाभल्याने कोणत्याही परिस्थितीवर हार न मानता सर्वांना बरोबर घेऊन तितक्याच निष्ठेने हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेणं हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव, प्रत्येकाशी आपुलकीने व नम्रतेने संवाद साधून, सर्वांशी विश्वासाचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करून मोठा मित्रपरिवार व जनसंपर्क त्यांनी निर्माण केला आहे.लोकांच्या विकासाचा विचार करून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांचे मूळ गाव असलेल्या सिरसाळा येथूनच त्यांच्या संघर्षमय पर्वाची सुरूवात झाली. या संघर्षात त्यांची नाळ सर्वसामान्यांशी घट्ट जुळली आणि परळी पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी उडी घेतली व निवडून येऊन,उपसभापती झाले. उपसभापती असताना ख-या आर्थाने शासनाच्या विविध योजना वाड्या वसत्यांवर पोहचवल्या. त्यामुळे गावात आले की घरातीलच सदस्यच आल्याची भावना लोकांमध्ये आहे. राष्ट्रवादी पक्षाचे परळी पंचायत समितीचे उपसभापती असताना त्यांनी अनेक विकासकामे केली. पंचायत समिती उपसभापती झाल्यापासून परळी या भागात शेकडो विहिरी मंजूर केल्या.परळी तालुक्या मधील राज्याचे माजी मंत्री आ धनंजयजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून घरकुल योजनेतून अनेकांना हक्काचे घर मिळाली आहेत.अनेक विकासकामांनी गावेच्या गावे सुंदर होतं आहेत. साहेबांचा हा विकास रथ म्हणजे एक स्वप्नणाती प्रवास आहे.प्रत्येक ठिकाणी स्वत:ची वेगळी ओळख जामिनियाँ कुरेशी निर्माण केल्याचे दिसते. ही वेगळी औळख निर्माण करण्याचे त्यांचे सामर्थ्य हे जनतेविषयी असणाऱ्या तळमळीतून आल्याचे जाणवते. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचं समाजकार्य सुरू आहे. परळी तालुक्यातील व सिरसाळ्याच्या सर्वांगीण विकासाची भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांनी अनेकांना मदत केली आहे.तसेच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. विकासकाम हेच जनसेवेचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी काम केले आहे.हा प्रवास असाच सुरू राहण्यासाठी साहेबांना उदंड निरोगी आयुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना व त्यांना वाढदिवसाच्या अंतःकरण पूर्वक शुभेच्छा.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या