🌟पुर्णेतील शासकीय गायरान जमिनीवरील ३२ ताबा धारकांना अतिक्रमण हटवण्या संदर्भात प्रशासनाने पाठवल्या नोटीसा...!


🌟अतिक्रमण तात्काळ हटवून मंडळ अधिकारी यांना ताबा न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे दिले संकेत🌟


पुर्णा (दि.०४ मे २०२३) - पुर्णा शहरातील मध्यभागात तब्बल १९ हेक्टर १४ गुंठे शासकीय गायरान जमिन असून या शासकीय गायरान जमिनीतील काही जमीन शासकीय गोदाम,कृषी उत्पन्न बाजार समिती,राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानक,पाटबंधारे विभाग,बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर स्मारक बुध्द विहार,बौध्द विद्यार्थी वस्ती गृह,शेड्यूल्ड काष्ट हॉस्टेल,शासकीय विश्रामगृह,जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आदीसाठी देण्यात आलेली असून उर्वरीत शासकीय गायरान जमिनीच्या भुखंडावर अनेक रथीमहारथींनी अलिशान इमारती उभारल्या आहेत यातील अनेकांनी तर अन्य सर्वे क्रमांकाच्या खरेदीखतांच्या आधारे नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे या शासकीय गायरान जमिनीवरील भुखंडाची रिव्हीजन रजिष्टरला नोंदी घेऊन बांधकाम परवाने काढून अलिशान इमारती उभारल्या आहेत.

  सदरील गंभीर बाब सखोल चौकशीअंती जिल्हा प्रशासनासह महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर खडखडून जागे झालेल्या प्रशासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १६६६ च्या ५० व १३ अंतर्गत माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्याकडील सिव्हिल अपिल क्रमांक ११३/२०११ एलएलपी (सी) ३१०९/११ जगपालसिंघ व इतर विरुध्द पंजाब राज्य व इतर या याचिकेवर मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.२८ जानेवारी २०११ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरून शासनाने दि.१२ जुलै २०११ रोजी शासन निर्णय निर्गमित केल्यानुसार पुर्णा शहरातील उच्चभ्रू वसाहतींच्या परिसरातील शासकीय गायरान जमिनींवर अलिशान इमारती उभ्या करीत शासकीय भुखंडावर ताबा केलेल्या तब्बल ३२ ताबा धारकांना महाराष्ट्र जमिन महसुल संहिता १९६६ च्या कलम ५० अन्वये निष्कासन नोटीसी तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्या स्वाक्षरीने दि.२६ एप्रिल २०२३ रोजी पाठवल्या असून या शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण दुर करू ताबा महसुल प्रशासनातील मंडळ अधिकारी यांना यांचेकडे न दिल्यास आपणास यानंतर कोणत्याही प्रकारची नोटीस न देता आपले सदर अतिक्रमण/बांधकाम शासकीय खर्चाने निष्कासित अर्थात उध्वस्त करण्यात येईल व त्यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम महाराष्ट्र जमिन महसुल संहिता १९६६ मधील तरतुदीनुसार महसुलाची थकबाकी म्हणून आपणाकडून वसूल करण्यात येईल असेही नोटीसीत नमूद करण्यात आल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून शहरासह तालुक्यात खळबळ माजली आहे.

शहरातील आदर्श कॉलनी आनंद नगर अंबिका नगर वैभव जिनिंग शास्त्री नगर कृषी उत्पन्न बाजार समिती जुना आडगाव रोड बसस्थानक या उच्चभ्रू वसाहतींच्या परिसरात असलेल्या या भुखंडावरील प्लॉट तब्बल ६५००/- ते ७०००/- रुपये स्क्वेअर फुटा प्रमाणे विक्री होत असून या परिसरात एका उद्योगपत्याने एका मोठ्या भुखंडाचे बनावट ले-आऊट आधारे रिव्हिजन रजिष्टरला नोंद करीत कोट्यावधी रुपयांचे श्रीखंड बनवून चाटल्याचेही या नोटीसीवरून निदर्शनास येत आहे महसुल प्रशासनाने ज्या ३२ अतिक्रमण ताबा धारकांना नोटीसा पाठवल्या आहेत ते शहरातील नामांकीत उद्योजक/व्यापारी/प्रतिष्ठित असल्यामुळे शासकीय गायरान भुखंडाचे श्रीखंड बनवून चाटणाऱ्या अनेक छुप्या भुखंड माफियांच्या पाचावर धारण बसली आहे.........


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या