🌟निष्पाप मनाचा निर्मळ हृदयी मनुष्यरुपी देवमानूस : सन्माननीय जगदीश जोगदंड माली पाटील गुरुजी...!


🌟आपला शिक्षकी पेशेचा वसा सांभाळत सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सद्गृहस्थाला मानाचा त्रिवार मुजरा🌟

परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातल्या ग्रामीण भागातील  गौर येथील जोगदंड माली पाटील घराण्यातील सन्माननीय रावसाहेब जोगदंड माली पाटील गुरुजी यांचे जेष्ठ सुपुत्र असलेले आदरणीय जगदीश रावसाहेब जोगदंड यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीपासूनच कला क्षेत्रासह सामाजिक राजकीय क्षेत्रात तसेच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार क्षेत्रात देखील आपल्या कर्तृत्वाची छाप पाडत प्रत्येकाच्या हृदयावर अधिराज्य गाजवले अत्यंत प्रेमळ मनमिळावू स्वभावाचे निष्पाप व्यक्तीमत्व असलेल्या जगदीश जोगदंड सर यांच्यातील कला कर्तृत्व आणि कौशल्याची जाणीव झाल्यामुळे इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री मोहन मोरे सर यांनी 'हिऱ्याची पारख जशी जोहरीला असते' तशी या 'कोहीनूर हिऱ्या' समान असलेल्या या निर्मळ हृदयी मनुष्यरुपी देवमानसाची अचूक पारख करीत त्यांची आपल्या संस्थेत शिक्षक या पदावर नेमणूक केली.

सन्माननीय रावसाहेब जोगदंड माली पाटील गुरुजी यांच्या आदर्शाचा वारसा कायम चालवत आदरणीय जगदीश जोगदंड सर यांनी आपल्या शिक्षक पदाच्या कारकिर्दीत असंख्य विद्यार्थी घडवले अनेक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी/विद्यार्थींनींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवून त्यांना वेळोवेळी सर्वतोपरी सहकार्य केले शिक्षण क्षेत्र/सामाजिक क्षेत्र/राजकीय क्षेत्र/राजकीय क्षेत्र/पत्रकार क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप टाकणारे जनसामान्यांच्या हृदयातील आदर्श कर्तृत्ववान शिक्षक आदरनीय जगदीश जोगदंड माली पाटील गुरुजी दि.३१ मे २०२३ रोजी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीतील प्रदिर्घ सेवा यशस्वीपणे बजावून आपल्या शिक्षकी जवाबदारीतून सेवानिवृत्त होत आहेत.


आदरणीय जगदीश जोगदंड माली पाटील गुरुजी यांच्या सेवा निवृत्तीचे औचित्य साधून पुर्णेतील स्वा.सै.(कै.) दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठाणच्या वतीने बुधवार दि.३१ मे २०२३ रोजी सायंकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास पुर्णेतील आदर्श कॉलनी मैदान येथे त्याच्या भव्य सेवागौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यास आशिर्वादपर उपस्थिती म्हणून मा.श्री.वेदमुर्ती उमेश महाराज टाकळीकर हे आवर्जून उपस्थित राहणार असून या भव्य सेवागौरव सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुर्णा तालुक्यातील जेष्ठ लोकप्रिय नेते तथा पुर्णा नगर परिषदेचे प्रदिर्घ नगराध्यक्ष म्हणून सेवा बजावलेले आदरणीय श्री उत्तमराव दादा कदम हे राहणार असून या सेवागौरव सोहळ्यास प्रमुख पाहूने म्हणून परभणी लोकसभा मतदार संघाचे खा.संजय उर्फ बंडू जाधव,शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांच्यासह प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक तथा प्रसिध्द कवी प्रा.इंद्रजीत भालेराव तसेच यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा पुर्णा नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष मोहनराव मोरे,श्री.जगदंबा विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव तथा प्राचार्या रजनीताई मोहनराव मोरे,बिड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वरराव चव्हाण,पाथरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष एकनाथराव शिंदे,महाराष्ट्र राज्य खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेचे राज्य सचिव हनुमंत राजे भोसले,दैनिक सकाळचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश पांडे,पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांची उपस्थिती राहणार असून या सेवा गौरव सोहळ्यास नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून उपक्रमशील कर्तृत्ववान व्यक्तीमत्वाचा गौरव करावा असे आवाहन स्वा.सै.(कै.) दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना ठाकरे गटाचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल विजयकुमार कदम,कार्याध्यक्ष डॉ.हरिभाऊ पाटील,कार्यवाहक संतोष एकलारे,सहकार्यवाहक अमृतराज कदम यांनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या