🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘वारसा शिल्पसंपदेचा’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन....!


 🌟यावेळी खासदार संजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती🌟

परभणी (दि.२६ मे २०२३): जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 'वारसा  शिल्पसंपदेचा' या कॉपी टेबलबुकचे प्रकाशन आज सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार संजय जाधव, आमदार विप्लव बाजोरिया, आमदार राहुल पाटील, आमदार सुरेशराव वरपुडकर, आमदार श्रीमती मेघना-साकोरे- बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे आणि जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर आदी उपस्थित होते. 

गत पाच वर्षापासून कार्यरत असलेल्या परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा अभ्यासागटाने परभणी जिल्ह्यातील ५५ स्थळांचे सर्वेक्षण करून जिल्ह्यातील १३० प्राचीन वारसा स्थळांची माहिती संकलित केली होती. या स्थळांची व्यावसायिक छायाचित्रकारामार्फत छायाचित्रे काढण्यात आली. परभणी जिल्ह्यातील स्थापत्य व शिल्प यांचा परिचय सर्वसामान्य नागरिकांना व्हावा आणि त्याविषयी उत्सुकता निर्माण व्हावी. त्या ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे या हेतूने पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. यासाठी समन्वयक जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर यांनी काम पाहिले. यावेळी अभ्यास गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

********************************************

🌟परभणी तालुक्यातील इनामी जमिनींचा एका साल लावणी वर्षासाठी जाहीर लिलाव बुधवारी....!


🌟या जमिनीच्या लिलावात इच्छुक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे - तहसीलदार गणेश चव्हाण

परभणी (दि.२६ मे २०२३) :  तालुक्यातील मंडळ अधिकारी पिंगळी, टाकळी कुंभकर्ण आणि झरी अंतर्गंत येणाऱ्या पिंपरी देशमुख, धर्मापुरी, पोरजवळा, जलालपूर आणि पिंपळा या गावांमधील इनामी जमिनींचे एक लावणी वर्ष २०२३-२४ साठी जाहीर लिलावाची प्रक्रिया बुधवारी (दि. ३१ मे) रोजी पार पाडली जाणार आहे. या जमिनीच्या लिलावात इच्छुक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार गणेश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

परभणी तालुक्यातील इनामी जमिनींचे २०२३-२४ या एका लावणी वर्षांच्या कालावधीसाठी पिंपरी देशमुख येथील इनामी जमीन गट नंबर १८३ मधील १२ हेक्टर १४ आर, धर्मापुरी येथील गट नंबर १९९ मधील १२ हेक्टर ६ आर, पोरजवळा येथील गट नंबर ६८ मधील ५ हेक्टर ५२ आर, जलालपूर येथील गट नंबर ६८ मधील २ हेक्टर ३० आर आणि पिंपळा येथील गट नंबर ७९ मधील ४ हेक्टर ४६ आर क्षेत्रफळाच्या जमिनीचा जाहीर लिलाव बुधवारी ३१ मे रोजी होणार आहे

            ही इनामी जमीन लावणी वर्ष २०२३-२४ या एका वर्षासाठी होणाऱ्या लिलावासाठी जाहीर प्रकटन देण्यात येत असून, या जाहीर प्रकटनाची संबंधित गावात दवंडी देऊन प्रसिद्धी करावी. तसेच एक प्रत ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर डकवावी. या जमिनीचा लिलाव करून जलसा पटी व हर्रास पटी जाहीर प्रकटनाच्या प्रसिद्धी रिपोर्टसह सोमवार, दि. २९ मे २०२३ रोजी या कार्यालयात सादर करावी. या जमिनीचा लिलाव बुधवारी दि. ३१ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. लिलावावेळी आपण स्वत: उपस्थित राहावे तसेच जास्तीत –जास्त गरजू नागरिकांना उपस्थित राहण्याबाबत कळविण्याचे आवाहन परभणीचे तहसीलदार गणेश चव्हाण यांनी केले आहे...

********************************************

🌟परभणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन...! 🌟रोजगार मेळावा शनिवार, दि.२७ मे रोजी आयोजित करण्यात आला🌟

परभणी (दि.२६ मे २०२३) :  राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,परभणी यांच्या विद्यमाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी  ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा शनिवार, दि.२७ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे असून, जास्तीत जास्त पदांची भरती करण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी मेळाव्यास wwwmahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपला सहभाग नोंदवावा. तसेच अधिक माहितीसाठी ०२४५२-२२००७४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या