🌟गडचिरोलीत काव्यमैफिलीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा.....!


🌟स्थानिक झाडी बोली साहित्य मंडळाचा प्रेरणादायी पुढाकार🌟

गडचिरोली (दि.०२ मे २०२३) - झाडी बोली साहित्य मंडळ गडचिरोली द्वारे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून डॉ.लेनगुरे यांचे निवासस्थानी काव्य मैफिल नुकतीच पार पाडण्यात आली. 

      सदर अविस्मरणीय  काव्यमैफिलीच्या अध्यक्षस्थानी झाडी बोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष कवीवर्य डॉ.चंद्रकांत लेनगुरे होते. अध्यक्षिय मनोदयात त्यांनी कामगार आणि शेतकरी यांच्या समस्या साहित्यातून प्रगट कराव्यात, असे आवाहन उपस्थितांना करून त्यांनी दीन महाराष्ट्र ही कविता याप्रसंगी सादर केली. उपस्थित झालेले कवी पुरुषोत्तम ठाकरे यांनी माझी कविता, कवी गजानन गेडाम यांनी एकटाच बसतो मी, कवी संजीव बोरकर यांनी जुगार ही गझल, कवी उपेन्द्र रोहणकर यांनी महाराष्ट्र माझा, कवयित्री प्रतिक्षा कोडापे यांनी जय महाराष्ट्र माझा, तर कवी कमलेश झाडे यांनी चोर ही रचना सादर केली. याच बैठकीत मंडळाची मासिक सभा घेण्यात येऊन  कवयित्री प्रतिक्षा कोडापे व कवी गजानन गेडाम यांची कार्यकारिणीवर सर्वानुमते सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या अविरोध निवडीबद्दल साहित्यिक बंडोपंत बोढेकर तसेच गडचिरोलीचे सुप्रसिद्ध कवी प्रा.विनायक धानोरकर, कवी डॉ.प्रवीण किलनाके, कवी जितेंद्र रायपुरे, कवी मारोती आरेवार, कवी प्रमोद राऊत, आणि कवयित्री मालती सेमले, कवयित्री वर्षा पडघन, कवयित्री प्रेमिला अलोने आदींनी दोघांचेही अभिनंदन केले.

     सदर कार्यक्रमाचे संचालन कमलेश झाडे यांनी तर आभार संजीव बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गीता लेनगुरे यांनी सहकार्य केले. ही बातमी आमच्या न्युजऑफिसला कृष्णकुमार निकोडे गुरुजींनी कळविली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या