🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील उखळद येथे पालघर घटनेची भयावह पुनरावृत्ती...!


🌟संघटीत ६ नराधमांनी चोर समजून ३ अल्पवयीन सिकलकरी युवकांना केली अमानुष मारहान एकाचा मृत्यू २ गंभीर जखमी🌟



परभणी (दि.२६ मे २०२३) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातल्या ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील उखळद परिसरातील उखळद-नवागड मार्गावरील ईदगाह वळनावर आज शनिवार दि.२७ मे २०२३ रोजी पालघर हत्याकांडा सारख्या घटनेची पुनरावृत्ती घडल्यामुळे परभणी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून आज शनिवार दि.२७ मे रोजी मध्यरात्री ०३-०० वाजेच्या सुमारास परभणी येथील बलसा खुर्द मार्गावरील साखला प्लाट परिसरात राहणाऱ्या सिख सिकलकरी समाजातील ३ अल्पवयीन तरुण आपले पाळीव डुकर शोधण्यासाठी पिंपरी देशमुख येथे गेले असता डुक्कर मिळून न आल्यामुळे वापस आपल्या घराकडे हिरो होंडा मोटरसायकलवरून निघाले असता पाच ते सहा नराधमांच्या टोळक्याने कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता त्यांना चोर समजून दोरखंडाने बांधून लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहान केली या मानवतेला काळीमा फासणाऱ्या हृदयविदारक घटनेत  किरपानसिंघ सुजीतसिंघ भोंड वय वर्षे १४ या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले अरुणसिंघ जोगींदरसिंघ टाक वय वर्षे १५,गोरासिंघ उर्फ सचिनसिंघ गुरबच्चनसिंघ दुधाणी वय वर्षे १६ हे दोघे गंभीर जखमी झाले यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या जमावातील काहींनी ११२ क्रमांक डायल करुन तात्काळ पोलिसांना पाचारण केले यावेळी पोलिसांनी तिघांना उचलून परभणी जिल्हा शासकीय सामान्य रुग्नालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता किरपानसिंघ सुजीतसिंघ भोंड या युवकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील उखळद येथे घडलेल्या या भयंकर घटनेने मुंबईतील पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ १६ एप्रिल २०२० रोजी चोर दरोडेखोर समजून ३ साधूंसह त्यांच्या कारचालकाची काठ्या लाठ्या दगडांनी निर्घृण हत्या करण्यात आली होती सदरील घटने प्रमाणेच उखळद गावात सदरील ३ युवकांवर झालेला हल्याचा प्रकार देखील काहीसा असाच असून उखळद गावात मागील या आठवड्यात काही चोरीच्या घटना घडल्या होत्या या संदर्भात स्थानिक गावकऱ्यांनी ताडकळस पोलिस स्थानकाशी संपर्क साधून या घटनां संदर्भात तक्रार अर्ज दिला होता ताडकळस पोलिस प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करुन रात्रीची गस्त वाढवली असती तर कदाचित् ही घटना टळली असती परंतु ताडकळस पोलिसांनी चोरीच्या घटनांसह तक्रारीची गांभीर्याने विचार न केल्यामुळे निरपराध अल्पवयीन युवकाला आपला प्राण गमवावा लागल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून या घटने संदर्भात ताडकळस पोलिसांनी परभणी जिल्हा शासकीय सामान्य रुग्नालयात अत्यंत गंभीर जखमी अवस्थेतील गोरासिंघ उर्फ सचिनसिंघ गुरबच्चनसिंघ दुधाणी या युवकाचा रितसर जवाब घेऊन ताडकळस पोलिस स्थानकात सहा  आरोपीं विरोधात कलम ३०२,३०७,३४१,१४३,१४७,१४८,१४९,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पुर्ण केले असले तरी परभणी जिल्ह्यात पुर्व जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांच्या काळात जवळपास संपुष्टात आलेली संघटीत गुन्हेगारी पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यातील पुर्णा ताडकळस चुडावा पोलिस स्थानकांमध्ये घडलेल्या गंभीर घटनां संदर्भात तक्रार देण्यास गेलेल्या तक्रारदारांची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यामुळे संबंधित तक्रारदार सरळ जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर यांच्याकडे न्याय मिळवण्यासाठी धाव घेतांना दिसत आहेत परंतू त्यांच्या आदेशानंतर देखील तक्रारदारांना न्याय मिळत नसल्यामुळे गुन्हेगारांना वाचवण्याचे गंभीर प्रकार होत असल्याचे दिसत आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या