🌟पुर्णा न.पा.च्या सावळ्या गोंधळात भ्रष्ट कावळे झाले गलेलठ्ठ ? तांत्रिक सल्लागारांना बेकायदेशीररित्या लाखो रुपयांची देयके प्रदान...!


🌟नगर परिषदेचे पुर्व मुख्याधिकारी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचे तांत्रिक सल्लागारांशी आर्थिक हितसंबंध🌟

✍🏻विशेष वृत्त - चौधरी दिनेश (रणजीत)

पुर्णा (दि.०४ मे २०२३) - पुर्णा नगर परिषदेच्या आर्थिक सावळ्या गोंधळात भ्रष्ट कावळे झाले आर्थिकदृष्ट्या गलेलठ्ठ अन् वरिष्ठ कारवाई करण्यात मठ्ठ अशी एकंदर परिस्थिती पुर्णा नगर परिषदेची झाल्यामुळे शहरातील विविध प्रभागांसह निर्मनुष्य वसाहतींमध्ये आवश्यकता नसतांना देखील करोडो रुपयांच्या विकासनिधीतून थातूरमातूर सिमेंट रस्त्यांसह सिमेंट नाल्यांची बांधकाम करून शासकीय विकासनिधीची धुळधान तर केली जातच आहे याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे एकीकडे नगर परिषदेच्या निर्लज्ज कारभारामुळे शहरात भरपावसात सिमेंट रस्ते नाल्यांची बांधकाम होत असल्यामुळे अक्षरशः या बोगस कामांचे पित्तळ उघडे पडतांना पाहावयास मिळत आहे तर दुसरीकडे पुर्णा नगर परिषदेच्या पॅनल वर नियुक्त असलेल्या तांत्रिक सल्नागार यांना शासन निर्णयाला पायदळी तुडवून बेकादेशीररित्या लाखो रुपयांची देयके प्रदान करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

पुर्णा नगर परिषदेचे पुर्व मुख्याधिकारी अजय नरळे तत्कालीन लेखापाल जे सद्या जिंतूर नगर परिषदेत लेखापाल म्हणून व पुर्णा नगर परिषदेत प्रभारी लेखापाल पदाचा पदभार सांभाळत असलेले प्रभारी लेखापाल प्रकाश कुंभार,लेखा लिपीक व सात्धक लेखापाल कैलास माकुलवार,संगणक अभियंता जे नियमबाह्य पध्दतीने प्रभारी नगर अभियंता म्हणून काम पाहणारे सिध्दार्थ गायकवाड,सहाय्यक नगर अभियंता संजय दिपके साहेब यांनी तांत्रिक सत्लागारांसोबत आर्थिक तडजोड करून अवाजवी देयके तर अदा करण्याचा महाप्रताप केलाच याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे भ्रष्टाचाराला आळा बसवण्याऐवजी जणूकाही खतपाणीच घालण्याचे पाप केल्याचे निदर्शनास येत आहे.

पुर्णा नगर परिषदे अंतर्गत महाराष्ट्र सरकारसह केंद्र सरकार कडून मंजुर केलेल्या विविध विकास योजनेतील कीट्यावधी रुपयांच्या विकास निधीतून पुर्णा शहरातील वेगवेगळ्या प्रभागात बोगसश निकृष्ट दर्जाची विकासकामे कामे मोठ्या प्रमाणात चालत असून. त्या सर्व कामाचे अंदाजपत्रक (इस्टीमेट) तयार करणे,सर्व कामाची तांत्रिक मान्यता घेणे, प्रत्यक्ष सर्व कामांचे प्लान तयार करणे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे यासाठी तांत्रीक खाजगी सल्लागारांना महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.व्र.५४/नवि-१६ मंत्रालय मुंबई ४०००३२ दि.०४ जुन २०१८ नुसार फक्त दोन टक्के देयके अदा करणे बंधनकारक असताना पुर्णा नगर परिषदेचे तात्कालीन पुर्व मुख्याधिकारी अजय नरळे यांनी पुर्णा नगरपालिकेचे लेखापाल. मुथायर खान यांनी संबंधित चार टक्के दराच्या देयकावर सह्या करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना रजेवर पाठवून व त्यांच्या जागी प्रभारी लेखापाल म्हणून जिंतुर येथील लेखापाल प्रकाश कुंभार यांची नियुक्ती करून त्यांना हाताशी धरत तसेच साहाय्यकू लेखापाल कैलास माकुलवार,प्रभारी नगर अभियंता (नियमबाह्य) तथा संगणक अभियंता सिध्दार्थ गायकवाड यांना प्रभारी नगर अभियंत्यांचा प्रभार देऊन सहायक नगर अभियंता संजय दिपके या सर्वाना हाताशी धरून मुख्याधिकारी नरळे यांचे मंगळवार दि.१७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५-०० वाजता लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे बदली झाल्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर देखील त्यांनी त्याच दिवशी रात्री ०९-०० ते ०९-४५ वाजेच्या सुमारास अचानक पूर्णा नगर परिषदेच्या कार्यालयात उपस्थित राहून ०४ टक्के दराने संबंधित तांत्रिक सल्लागार यांना लाखो रुपयांची देयके प्रदान केली.

पूर्णा नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुर्णा शहरातील वेगवेगळ्या प्रभागात केेलेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामाची करोड़ो रुपयांची देयके अदा करुन महाराष्ट्र सरकारकडुन ठरवून दिलेल्या सर्व शासकीय नियमांना अक्षरशः पायदळी तुडवण्याचे काम केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गैरकारभाराची चौकशी करू नयें याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असा गैरसमज करून दिला आहे की पुर्णेतील लोक सातत्याने तक्रारी करीत असतात या तक्रारींमध्ये काहीही तथ्य नसते परंतु नागरिकांनी केलेल्या  तक्रारींमध्ये तथ्य आहे किंवा नाही याची सखोलपणे चौकशी करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही टाळल्यामुळे नगर परिषदेतील भ्रष्ट कारभाराला बळ देऊन गेल्यामुळे भ्रष्टाचारात आणखीनच भर पडल्याचे दिसत आहे.

पुर्णा नगर परिषद तांत्रिक सल्लागार सदर रक्कम ही प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या करोडो रुपयांच्या त्या त्या योजनेच्या फंडा मधून. तसेच उर्वरित रक्कम ही पुर्णा नगरपरिषद फंडा मधून देण्यात आली आहे. याचा अर्थ असा होतो की नगरपरिषद फंडातील रक्कम ही कर्मचान्यांचा वेतनासाठी राखीव असते. महत्वाचे म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व मस्लिम समाजाच्या रमजान ईद हे सर्वात महत्त्वाचे सण एप्रिल महिन्यात असतांना देखील पुर्णा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न करता तांत्रिक खाजगी सल्लागार यांना मुख्याधिकारी अजय नरळे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकार्यांनी नियमबाह्य पद्धतीने लाखो रुपये अदा करुन प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. मुख्याधिकारी अजय नरळे यांनी स्वतःचे हित साध्य करण्याकरिता महाराष्ट्र सरकारच्या सर्व नियमांना तिलांजली देऊन चार टक्के दराने करोडो रुपये. पुर्णा नगरपालिकेचा पदभार स्वीकारल्या पासून संबंधित तांत्रिक सल्लागारांना वाटप करुन भ्रष्टाचाराला प्राधान्य दिल्यामुळे या सर्व गंभीर प्रकरणांची लवकरात सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा लवकरच लोकशाही मा्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे माझी पुर्णा संघर्ष प्रतिष्ठानच्या लेटरहेडवर संस्थापक अध्यक्ष राजू नारायनकर यांनी दिला आहे........टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या