🌟परभणी येथे जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन.....!🌟जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास जगताप यांचे मार्गदर्शन🌟 

परभणी (दि.१९ मे २०२३): जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत ३१ मे जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.


जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध ठिकाणी सार्वजानिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.   जागतिक आरोग्य संघटनेचे संनियंत्रण अधिकारी डॉ. मुजीब, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कलिदास नीरस, डॉ. वाघमारे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी निखिल पुजारी यांच्या उपस्थितीत बैठक नुकतीच घेण्यात आली. 

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तालुकास्तरीय समिती स्थापन करून त्या कार्यान्वित करण्यासाठी सूचना डॉ. पांचाळ यांनी दिल्या तसेच जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था कोटपा कायद्याची पूर्तता करून तंबाखूमुक्त घोषित करण्यास मार्गदर्शन केले. तसेच केलेल्या कार्याचा अहवाल लवकरात लवकर जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष येथे पाठविण्यास सांगितले. 

यावेळी जिल्हा सल्लागार डॉ. रुपाली रणवीरकर आणि विभागीय अधिकारी वायू नियंत्रण कार्यक्रम, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अभिजीत संप यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. कार्यक्रम यशस्वतेसाठी जिल्हा नोडल अधिकारी निखिल पुजारी, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे केशव गव्हाणे, अभिजीत संघई यांचे सहकार्य लाभले. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या