🌟पुर्णा नगर परिषद प्रशासनातील भ्रष्टाचाररुपी अजगर शहराच्या सर्वांगीन विकासाला गिळकृत करणार की काय ?


🌟नगर परिषद प्रशासन/गुणनियंत्रण विभागाची मिलिभगत सब मिलबाटके खाते हैं नगद ?🌟


पुर्णा नगर परिषद प्रशासनातील भ्रष्टाचारुपी महाअजगर शहराच्या सर्वांगीन विकासाला गिळकृत करणार की काय ? असा गंभीर प्रश्न शहरातील जनसामान्यांतून उपस्थित होतांना दिसत संपूर्ण शहरात निकृष्ट व बोगस कामांची मालिका चालवून करोडो रुपयांच्या शासकीय विकासनिधीला भ्रष्टाचाराच्या भुकेतून बोकाळलेले भुंगे लागल्यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागात निकृष्ट व बोगस सिमेंट रोड/सिमेंट नाल्यांसह विविध विकासकामांची जणुकाही सुनामीच आल्याचे पाहावयास मिळत असून या भ्रष्ट व निर्लज्ज कारभाराला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील भुकसंमती असल्यामुळे अनेक तक्रारदार नागरिकांच्या तक्रार अर्जांचा चौकशी पुर्वीच पोछा बनवला जात असून तक्रारदारांना तुम्हाला उगाच तक्रारी करीत राहण्याची सवयच असल्याचे म्हणून अक्षरशः धुतकारले जात आहे त्यामूळे जिल्ह्यात भ्रष्टाचाऱ्यांना मान सन्मान तर तक्रारदारांना अपमानाला सामोरे जावे लागत आहे.


पुर्णा नगर परिषद प्रशासन तसेच गुणनियंत्रण विभागाची मिलिभगत और सब मिलबाटके खाते हैं नगद ? अशी परिस्थिती एकंदर पाहावयास मिळत असून शहरातील प्रभाग क्रमांक ०७ या प्रभागातील हरी नगर,नालंदा नगर या परिसरातील  रवी वाघमारे बंटी घाटगीळ,राजु  बोधक यांच्या घरासमोर तसेच ठाकुर यांच्या घरासमोर ते रवी रावजी गायकवाड यांच्या घरा समोर प्रभारी मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्या व संगणक अभियंता तथा नियमबाह्य प्रभारी नगर अभियंता सिध्दार्थ गायकवाड यांच्या कृपा दृष्टीने शासकीय अंदाजपत्रकाला अक्षरशः मुठमाती देत मनमानी पध्दतीने हुकूमशाही पद्धतीचा अवलंब करीत तक्रारदारांना धमकावत शहरातील एक मोठा 'पन्नास खोके एकदम ओके' गटाचा पुढारी कम पडद्यामागील गुत्तेदार पाठराखा असलेल्या कंत्राटदार एजन्सी नगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यां सोबत हात मिळवणी करून एक कोटी रुपयांच्या विशेष शासकीय विकासनिधीतून अत्यंत दर्जाहीन निकृष्ट दर्जाचे सिमेंट रोड व सिमेंट नालीचे काम करीत शासकीय विकासनिधीची उधळन करीत असतांना प्रभारी मुख्याधिकारी संतोष लोमटे यांची लोमटेगिरी भ्रष्ट गुत्तेदारांच्या भामटेगिरीला काय म्हणून पाठीशी घालत आहे ? असा संतप्त सवाल परिसरातील नागरीक उपस्थित करतांना पाहावयास मिळत असून या परिसरात झालेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रोड व सिमेंट नाल्यांसह मागील दोन वर्षांपूर्वीच ६० लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या जुन्याच कामांवर. नव्याने काम केल्याचं दाखवून या परिसरातील सुभेदार रामजी आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाची थातुरमातूर डागडुगी,रंगरंगोटीची काम करीत तब्बल ५० लक्ष रुपयांचा विकासनिधी गिळकृत करण्याचा गंभीर प्रकार देखील होत असल्याचे दिसत आहे.....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या