🌟परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांद्वारे खा.फौजीया खान यांना ठोस आश्‍वासन...!


🌟परभणीतील शासकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया वेळेवरच🌟

परभणी (दि.१० मे २०२३) : परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया येत्या शैक्षणिक वर्षातच तेही वेळेवर सुरु होईल, असे ठोस आश्‍वासन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काल बुधवार दि.०९ मे २०२३ रोजी दिले असल्याची महत्वपूर्ण माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा  खासदार श्रीमती फौजिया खान यांनी नवी दिल्लीवरुन प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.


          केंद्रीय मंत्री मांडविया यांची काल बुधवारी दुपारी ०२-०० वाजता खा.संजय जाधव व आपण स्वतः भेट घेतली. या भेटीतून परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत उद्भवलेल्या अडी-अडचणींची माहिती दिली. सर्वार्थाने गुणवत्तेत आघाडीवरील या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया येत्या शैक्षणिक वर्षात वेळेवर सुरु व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तेव्हा केंद्रीय मंत्री मांडविया यांनी आपण काळजी करु नका, येत्या शैक्षणिक वर्षापासूनच परभणीतीलही प्रवेश प्रक्रिया सुरु केली जाईल, असे ठोस आश्‍वासन दिले असल्याचे खासदार श्रीमती खान यांनी दिलासाशी बोलतांना नमूद केले.

        केंद्रीय दोन सदस्यीय पथकाने काढलेल्या त्रुटींविरोधात राज्य सरकारद्वारे अपील दाखल करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आता तपासणी होईल. त्यातून समाधानकारकच स्थिती समोर येईल, परंतु त्याही समितीने काही त्रुटी काढल्यास पुन्हा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे अपील दाखल करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असे नमूद करीत श्रीमती खान यांनी, त्या स्थितीत सुध्दा आपल्याकडे अपील दाखल झाल्यास त्यावर तात्काळ निर्णय घेवू, असेही ठोस आश्‍वासन केंद्रीय मंत्र्यांनी आपणास दिल्याचे म्हटले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या