🌟परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष शेख सलीम पहेलवान यांच्यावर प्राणघातक हल्ला.....!


🌟त्यांच्यावर जमिनीच्या वादातून हल्ला झाला असल्याचे समजते🌟

परभणी (दि.१६ मे २०२३) - परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष शेख सलीम पहेलवान यांच्यावर काल सोमवार दि.१५ मे २०२३ रोजी सायंकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास अज्ञात चार ते पाच हल्लेखोरांनी येलदरी रस्त्यावरील साखरतळा नाक्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्यात शेख सलीम यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

शहरातीलच एका तरुणासोबत शेख सलीम यांचा जमिनीचा वाद होता. पैशाच्या देवाण-घेवाणीवरून संबंधित तरुणाचे बिनसल्याने त्याने हिंगोली येथील मस्तान शहानगरातील तरुणांना सलीम पहेलवान यांना जीवे मारण्याची सुपारी दिली असल्याचे समजते त्यातून त्यांच्यावर वाहन एम.एच.३८,६६७८ मध्ये बसून सदरील मारेकरी आले व सायंकाळी ०६-०० वाजण्याच्या सुमारास सखरतळा नाक्यावर उभ्या असलेले शेख सलीम यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. प्रसंगावधान राखून शेख सलीम यांनी प्रतिकार केला व आजूबाजूचे नागरिक धावत आल्याने पुढील अनर्थ टळला. या गडबडीत नागरिकांनी एका आरोपीला पकडले तर इतर पळून गेले. याबाबत नागरिकांनी पकडलेल्या आरोपीने सुपारी देणाऱ्या तरुणाचे नाव पोलिसांना सांगितल्याचे समजते. गंभीर जख्मी अवस्थेत असलेल्या सलीम यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ आभुरे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात खाजगी वाहनातून हलवण्यात आले आहे.दरम्यान घटनेची माहिती शहरात पसरताच पोलीस ठाणे,व ग्रामीण रुग्णालयात नागरिकांना एकच गर्दी केली होती. याबाबत हे वृत लिहिपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या