🌟ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मकरंद यांच्या भूखंडाची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष क्षेत्र पाहणी....!


🌟जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकाप्रती संवेदनशीलता🌟

परभणी (दि.१७ मे २०२३) : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण बळीराम मकरंद यांना महानगरपालिका हद्दीत देण्यात आलेल्या भूखंडाची आज सायंकाळी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी अत्यंत संवेदनशीलतेने लक्ष घालत भेट देऊन क्षेत्र पाहणी केली. तसेच पुढील आठ दिवसांमध्ये भूखंडाचे सपाटीकरण व स्वच्छता करून देण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासनाला यावेळी दिले.


महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, तहसीलदार गणेश चव्हाण, शहर अभियंता वसीम पठाण, सहायक संचालक नगररचनाकार पवन देशमुख, मालमत्ता व्यवस्थापक नसीरोद्दीन काझी यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मकरंद यांना महानगरपालिकेकडून १४ ऑगस्ट २०२२ रोजी साखला प्लॉट परिसरातील (सर्व्हे नंबर ५०८) भूखंड वाटप करण्यात आला होता. मात्र १२ एप्रिल २०२३ रोजी प्रशासनाकडून प्रत्यक्ष नोंदणी करताना येथे झाडे-झुडपे असून, जवळूनच नाला वाहतो, त्यामुळे तो राहण्यायोग्य नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला होता. परंतु, सध्या महानगरपालिका क्षेत्रात दुसरा भूखंड नसल्यामुळे त्यांना प्रशासनाकडून या परिसरातील जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त श्रीमती सांडभोर यांनी यावेळी जिल्हाधिकार-यांना सांगितले.

त्यामुळे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाच्या या भूखंड प्रकरणात जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी अत्यंत संवेदनशीलतेने लक्ष घालून आज प्रत्यक्ष भूखंडाची पाहणी केली. त्यावेळी श्री. मकरंद यांचा मुलगा तसेच दोन्ही नातवांना बोलावून घेत, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच पुढील आठवड्याभरात महानगरपालिका प्रशासनाने संबंधित भूखंडाची स्वच्छता आणि सपाटीकरण करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या