🌟परळी नगर पालिकेतील रिक्त पद भरतीची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी....!


🌟अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी केली🌟               

परळी (दि.०५ मे २०२३) - परळी नगर पालिकेतील रिक्त पद भरतीची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी केली आहे.  


           
                 

 याबाबत सविस्तर माहिती अशी की राज्यातील नगरपरिषदा ग्रामपंचायतच्या मंजूर आकृतीबंधानुसार आस्थापनेवर रिक्त पद असल्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत व विहित वेळेत पार पडण्यात अडचणी निर्माण होत असल्यामुळे राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पद भरती राबविण्यात यावी असे शासनादेश असून सदरील पद भरती ही माहे ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करण्यात यावे असे शासन आदेश असून याचाच भाग म्हणून परळी नगरपालिकेला ही कळविण्यात आले असून या संचालनालयाने मंजूर केलेल्या एकूण रिक्त पदाच्या भरती बाबतच्या मागासवर्गीय कक्षाकडून रोस्टर तपासणी तात्काळ करून तदनंतर स्थायी रिक्त पदाच्या पद भरती बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अद्यावत शासन निर्णय परिपत्रक तसेच संचालनालयाच्या स्थायी निर्देशानुसार परिपूर्ण प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करावा असे आदेशानुसार व परळी नगरपालिकेतील एकूण रिक्त 135 जागेची पद भरतीसाठी खालील पदे क्लार्क 18 ड्रायव्हर दोन पंप ऑपरेटर दोन तारतंत्री वायरमन एक उद्यान पर्यवेक्षक एक ग्लानिचालक एक ग्रंथपाल एक सहाय्य ग्रंथपाल एक शिपाई 11 सफाई कामगार 89 वॉलमन दोन फायरमन चार हवालदार नाईक दोन अशा एकूण 135 जागेची पद भरती करण्यासाठी जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी. अशी लेखी मागणी बीडचे पालकमंत्री. जिल्हाधिकारी बीड .विभागीय आयुक्त औरंगाबाद .व मुख्याधिकारी नगरपरिषद परळी इत्यादींनाही देण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या