🌟घरचे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासुनच पेरणी करावी....!


 🌟पुर्णा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकांचे शेतकऱ्यांना आवाहन🌟


पुर्णा (दि.२६ मे २०२३) :- मा प्रकल्प संचालक आत्मा श्री दौलत चव्हाण सर प्रकल्प उपसंचालक आत्मा श्री  बनसावडे सर तालुका कृषी अधिकारी पूर्ण श्री आबासाहेब देशमुख सर यांचे सूचनेनुसार पर्यावरण पूरक जीवन पद्धती सप्ताह निमित्त मौजे कातनेश्वर तालुका पूर्णा येथे महिलांची कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये मार्गदर्शन करताना तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पूर्णा श्री विलास जोशी यांनी घरचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरण्यापूर्वी उगवन क्षमता तपासून घ्यावी यावर मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले 70 टक्के उगवण क्षमता असेल तरच घरचे सोयाबीन बियाणे वापरावे   जैविक जिवाणू संघ वापरून सोयाबीन बीज प्रक्रिया करावी तसेच बीजप्रक्रियेसाठी इलेक्ट्रॉन बास्केट वार्डन याचा देखील वापर करावा असे देखील सांगितले तसेच सध्या शंखी गोगलगायीचा प्रश्न उद्भवत असल्याने शंखी  गोगलगायचे नियंत्रण करताना उन्हाळ्यामध्ये खोल नांगरटी करावी गोगलगायीचा प्रादुर्भाव जाणवत असल्यास एकत्र गोळा करून त्यामध्ये कोरडे मीठ टाकून नष्ट कराव्यात  याविषयी देखील मार्गदर्शन केले सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक पूर्णा श्री रवी माने यांनी नैसर्गिक शेती करण्याविषयी  तसेच निंबोळी अर्काचा वापर व पाच टक्के निंबोळी अर्क कसे बनवावे याविषयी मार्गदर्शन केले कृषी सहाय्यक विखे मॅडम यांनी दशपर्णी अर्क तयार करून फवारणी करावी याविषयी मार्गदर्शन केले प्रगतिशील महिला शामला चापके, संध्या चापके, सरस्वती चापके, अर्चना पांडे, सीता खोंडे, माधुरी चापके आदी  सहित शेतकरी बचत गटातील महिला बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित होत्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या