🌟राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम.व्यंकटेशन यांची भाऊचा तांडा घटनेतील कुटुंबियांची भेट...!


🌟त्यांनी या घटनेतील मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले🌟


परभणी (दि.२४ मे २०२३) : परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथे दि. ११ मे रोजी सेप्टिक टॅंकची सफाई करताना एकाच कुटुंबातील पाच सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. त्या अनुषंगाने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन हे आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी या घटनेतील मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.


यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर.,  जि.प. च्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, सोनपेठ नगरपालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे आदी उपस्थित होते. 

  राज्य शासनाकडून मिळालेल्या आर्थिक मदतीबाबत त्यांनी चौकशी संबंधितांकडे केली. श्री. व्यंकटेशन यांच्या हस्ते पीडितांच्या कुटुंबियांना सोनपेठ नगर परिषदेतील आधिकारी-कर्मचारी यांनी दिलेल्या एक दिवसाच्या वेतनाची रक्कम, संबंधित कंत्राटदारांनी दिलेले ५० हजार मदत, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन, एक महिन्याचे धान्य किट, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा कार्डचे यावेळी वितरण करण्यात आले.


श्री. व्यंकटेशन यांनी यावेळी नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत मागणीची माहिती घेतली. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांना सेवेत कायम करून घेऊन मानधनात वाढ करण्याची त्यांच्याकडे मागणी केली. या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल, असे श्री. व्यंकटेशन यांनी सांगितले.प्रारंभी श्री. व्यंकटेशन यांनी घटनास्थळी भेट देवून संबंधिताकडून सविस्तर माहिती जाणून घेत त्यांना धीर दिला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या