🌟पुर्णेतील १४ ते १९ वर्षे वयोगटातील खेडाळूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.....!


🌟हरियानातील रोहतक येथे उद्या ०४ मे रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुर्णेतील खेडाळू आज ०३ मे रोजी रवाना🌟

पूर्णा ( दि.०३ मे २०२३) मराठवाडा विभाग अंतर्गत अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन परभणी तर्फे पूर्णा येथील रेल्वे आरआरसी मैदान येथे जिल्हास्तरीय अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. २०  एप्रिल रोजी करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये वयोगट 14 वर्षे मुले व 19 वर्षीय मुले या वयोगटा करीत हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या या स्पर्धेसाठी जिल्हाभरातील ६५ हून अधिक खेळाडूं यांनी या निवड चाचणीस सहभाग नोंदवला होता या निवड चाचणी प्रमुख पाहुणे म्हणून पूर्णा रेल्वे इन्स्टिट्यूटचे सचिव कांचन ठाकूर, स्पर्धा तांत्रिक समिती प्रमुख म्हणून श्री वसंत कऱ्हाळे जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पूर्ण निवड चाचणी पर्यवेक्षक म्हणून नांदेड जिल्हा सचिव निलेश खराटे हे उपस्थित होते .

 याप्रसंगी जिल्हा अंडरआर्म असोसिएशनचे अध्यक्ष श्री शंकर गायकवाड, सचिव प्राध्यापक डॉक्टर महेश जाधव कार्याध्यक्ष  नितीन गवळी, प्रसिद्धीप्रमुख शिव प्रसाद देवणे सदस्य सुरेश बगाटे आदींच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेची निवड चाचणी करण्यात आली होती या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात १४ वर्षे वयोगटात तील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव अथर्व तापडिया श्रीनिवास डाके, यश जाधव सोहेल शेख प्रथमेश ढगे सुशांत गवते रुद्र स्वामी शौर्य पल्लेवार आदर्श वाघमारे कार्तिक जाधव तर महाराष्ट्र राज्य संघ वयोगट १९ वर्षातील मुले सिद्धांत दायमा पुष्कर भंडारी स्वराज्य जाधव आयुष्य ढगे कल्याण डायमा अमित जोगदंड प्रतीक रणवीर फैजान पठाण शिवम एकलारे उत्कर्ष साबणे राजेश कुऱ्हे रोहित कापुरे रोहित भगत युवराज बोहोल पृथ्वी बोहोल अब्जर खान इत्यादी खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली असून या निवड चाचणीस निवड झालेल्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धा ही महर्षी दयानंद विद्यापीठ रोहतकत हरियाणा येते दि. ०४.०५.०६.मे रोजी ही स्पर्धा होणार असून या या स्पर्धेसाठी पूर्णतील 14 वर्षीय व 19 वर्षीय मुले यांना सकाळी रेल्वे गाडी क्रमांक १२७१५ नांदेड ते सचखंड या एक्सप्रेस गाडीने शुभेच्छा देऊन रवाना करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या