🌟परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील डिग्रस येथे अवैध वाळू उत्खनना विरोधात कार्यवाहीस गेलेला तलाठी नदीपात्रात बुडाला..!


🌟घातपात की अपघात चर्चेला उद्यान : प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू🌟

परभणी (दि.२५ मे २०२३) - जितूर तालुक्यातील नदीपात्रातल्या वाळू धक्यांवर अवैध वाळू तस्करांकडून होणाऱ्या अवैध वाळू उत्खननासह मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चोरट्या वाळू तस्करी विरोधात कार्यवाही करण्यासाठी गेलेला महसुल प्रशासनात कार्यरत तलाठी पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दि.२५ मे २०२४ रोजी सकाळी ११-०० वाजताच्या सुमारास घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली असून हा घडलेला गंभीर प्रकार अपघात की घातपात ? या उपस्थित होणाऱ्या प्रश्नामुळे महसुल प्रशासनासह जिल्हा प्रशासन देखील प्रश्नार्थक मुद्रेत असल्याचे बोलले जात आहे

जिंतूर तालुक्यातील  डिग्रस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर तलाठी सुभाष होळ व धनंजय सोनवणे यांच्यासह पोलीस पाटील हे धक्यावर गेले, धक्क्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी जिंतूर तालुक्याच्या अलीकडील  भागातून वाळू उपसा बंद होता मात्र त्याच नदीच्या पलीकडल्या भागावर सेनगाव तालुका येतो आणि त्या ठिकाणी वाळू धक्का चालू असल्याचे त्यांना दिसले शिवाय कॅनी च्या साह्याने उपसा सुरू असल्याचे दिसले त्यांनी पोहत काठावर जाण्याचा प्रयत्न केला त्यांना पोहताना दम लागला असावा असा अंदाज व्यक्त होत असून तलाठी होळ हे नदीपात्रातील ७०% अंतर पार करून गेले खरे परंतू ते तिकडे पोहचले नसल्याचे बोलले जात असून उशिरापर्यंत त्यांचा शोध सूरू होता.

परभणी येथून एन.डी. आर एफचे पथक बोलावण्यात आले,दरम्यान घटनेची माहिती मिळतात महसूल उपविभागीय अधिकारी संगेवार प्रभारी तहसीलदार परेश चौधरी,सेलू तहसीलदार दिनेश सापले, नायब तहसीलदार प्रशांत खारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास खोले, मंडळ अधिकारी प्रशांत राखे यांच्यासह अनेक जण  दिग्रस या ठिकाणी तळ ठोकून आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या