🌟पुर्णा नगर परिषदेतील प्रभारी मुख्याधिकारी राज्य अखेर संपुष्टात : नुतन मुख्याधिकारी म्हणून युवराज पौळ यांची नियुक्ती...!


🌟मुख्याधिकारी श्री.पौळ यांच्या समोर मान्सुनपुर्व स्वच्छतेसह निकृष्ट व बोगस विकासकामांच्या चौकशीचे फार मोठे आव्हान🌟  

पुर्णा (दि.०१ जुन २०२३) - पुर्णा नगर परिषदेतील प्रभारी मुख्याधिकारी राज्य संपुष्टात आले असून आता प्रभारी मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्या जागेवर कायमस्वरुपी मुख्याधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने शासन आदेश क्रमांक एमसीओ-२०२३/प्र.क्र.०१/नवि-१४ अंतर्गत दि.३१ मे २०२३ रोजी शासनाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांच्या आदेशाने बुलढाण्याचे मुख्याधिकारी गट.ब (प्रशिक्षणार्थी जिल्हा बुलढाणा) श्री.युवराज पौळ यांची पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.


पुर्णा नगर परिषदेचे नुतन मुख्याधिकारी म्हणून युवराज पौळ यांना आज गुरुवार दि.०१ जुन २०२३ रोजी पदभार स्विकारून तसा अनुपालन अहवाल शासनाला तात्काळ सादर करण्याचेही आदेशात नमुद करण्यात आले असून ऐन मान्सुनपुर्व सहा दिवस अगोदर श्री.पौळ यांना कायम मुख्याधिकारी म्हणून पुर्णा नगर परिषदेचा पदभार देण्यात आल्यामूळे त्यांच्या समोर शहरातील स्वच्छतेसह मान्सुनपुर्व उपाययोजनांसह शहरातील विविध प्रभागात झालेल्या व सद्या सुरु असलेल्या निकृष्ट व बोगस कामांच्या सखोल चौकशीसह कारवाईचे फार मोठे आव्हान उभे राहणार आहे या सर्व बाबींवर ते काय उपाययोजना करतात हे तर येणाऱ्या काळातच उघड होणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या