🌟परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे रस्ता सुरक्षा सप्ताहा निमित्त जनजागृती.....!


🌟या कार्यक्रमाला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अभिजित वाघमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

परभणी (दि.१७ मे २०२३) : नागरिक आणि वाहनधारकांमध्ये वाहन चालविताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, परभणीकडून ७ यूएन ग्लोबल रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३ च्या अनुषंगाने नुकतेच जिंतूर येथे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अभिजित वाघमारे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जयंत अंकमवार आणि सिद्धेश्वर विद्यालयाचे श्री. दुधगावकर हे उपस्थित होते.परभणी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने अभिजित वाघमारे व अंकमवार यांनी सर्वांना रस्ता सुरक्षा व जनजागृतीबाबतचे महत्व पटवून दिले. त्यांना वाहतुकीचे नियम, पादचाऱ्यांचे कर्तव्य व नियम, सायकलस्वारांनी घ्यावयाची काळजी, वाहतुकीचे चिन्ह, गोल्डन आवर यासह सायकल चालवताना घ्यावयाची काळजी, स्कूल बसमध्ये चढताना व उतरताना घ्यावयाची काळजी तसेच मोटार वाहन कायद्यातील दंडात्मक तरतुदी या सर्व बाबींची माहिती दिली व वाहनाची लेन कशी बदलावी, याबाबतचे प्रात्यक्षिक उपस्थितांना करून दाखविले.  रस्ता सुरक्षा सप्ताहाचा हा कार्यक्रम आरबी क्लासेस जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांनी मार्गदर्शन केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या