🌟पुर्णा तालुक्यातील माखणी येथील प्रगतशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेवर निवड....!


🌟जनार्धन आवरगंड यांची शेतकरी प्रतिनिधी म्हणून करण्यात आली निवड🌟

पुर्णा (दि.०४ मे २०२३) - पुर्णा तालुक्यातील माखणी येथील प्रगतशील शेतकरी तथा भाजीपाला ग्रुपचे सदस्य जनार्धन बालासाहेब आवरगंड यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेवर (जिल्हा पुरवठा विभाग ) शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवड जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली आहे.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा ग्राहक संरक्षण परीषद समिती नुकतीच जाहीर करण्यात आली या समितीमध्ये अशासकीय १४ सद्स्य असुन त्यात ग्राहक संघटना सद्स्य ०९ , शेतकरी प्रतिनिधी 02, वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधी ०१ , गॅस व पेट्रोल प्रवर्गातील ०१ ,व अन्य एक असे एकूण १४  सद्स्य समिती गठित करण्यात आली आहे . ही जिल्हा पुरवठा विभागाचे अशासकीय सद्स्य म्हणून निवडले गेले आहेत . या समितीत विलास मोरे , मधुकर मुळे ,शामराव रणेर , श्रीमती मिरा शेळगावकर,श्रीमती मंजुषा कुलकर्णी , धाराजी भुसारे , गुलाब शिंदे , भास्कर कदम , सोपान टोले , गंगाधर देशमुख , संदिप चव्हाण , रोहित काला, डॉ.संगीता अवचार  अदीचे अशासकीय सद्स्य म्हणून निवड करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या