🌟बहीणीच्या लग्नात आंदण म्हणून गिर गाय व वऱ्हाडी मंडळीना दोन वर्षाची आंबा चिंच,वड,पिंपळ,असे विविध रोपटे देण्यात आली...!


🌟दोन्ही विवाह कुटूंबातील सर्व सद्स्य बी एस स्सी ॲग्री शिक्षण घेतल्या वृक्ष लागवड संगोपनाची आवड🌟


🌟सर्व वऱ्हाडी मंडळीना मुळाची भेटवस्तू दिर्घायुषी रोपटे भेट🌟 

परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जनार्धन आवरगंड या उपक्रमाशील शेतकरी मित्राने विवाह जुळवला .  सोबत भाजीपाला व्हाट्सअप ग्रुप मधील बालाजी लोखंडे हे ही होते. मागील पाच-सहा वर्षांपासून एक मूल तीस झाडे अभियानाच्या माध्यमातून लग्न सोहळ्यात राबवल्या जाणाऱ्या शेतकरी उपयोगी उपक्रम, या लग्न सोहळ्यात बालाजी आपल्या बहिणीसाठी राबवणार होता. म्हणून या सोहळ्यात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहावे, असा बालाजीचा आग्रह होता.


       बालाजी हा बीएससी ऍग्री झालेला तरुण. अत्यंत कष्टाने शेती करतो. आपल्या बहिणीचे लग्न चांगले झाले पाहिजे; हा बालाजीचा सगळ्याच भावांसारखा निर्मळ विचार.  आपण करत असलेल्या शेतीवरच हे लग्न अवलंबून असल्यामुळे शेतीला पूरक असे लग्न झाले पाहिजे, असे बालाजीने ठरवले. बहिणीसाठी शोधलेला नवरदेव आशोक  हा सुद्धा बीएससी ऍग्री झालेला. एक सुधारित शेतकरी. शेतात वेगवेगळे प्रयोग करून चांगले उत्पादन घेणारा. आपल्या परिसरात उपक्रमशील तरुण शेतकरी म्हणून समोर आलेला. बालाजीच्या शेतकरीसवाद उपक्रमासाठी मान्य झाला."  मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी " आपल्या विकासाची जाणीव महत्त्वाची आहे.

 त्याचबरोबर लग्न शेतीपूरक उपक्रम असले पाहीजे 

बालाजीने लग्नाची मूळं देत असताना इतर वस्तूंच्या ऐवजी एक चांगले रोप मूळ म्हणून भेट देण्याचे ठरवले.  लग्न सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला एक दीर्घकाळ टिकणारे रोप भेट देण्याचे ठरवले. आपल्या बहिणीला दीर्घकाळ टिकणारी 31 फळझाडांची रोपे तसेच एक लाल कंधारी गाय देण्याचे ठरवले. लग्न सोहळ्याप्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रातील उपक्रमशील व्यक्तींचा सत्कार करण्याचा निश्चय केला आणि या प्रकारे कामाला सुरुवात केली.

         लोहा तालुक्यातील पेनुर गावच्या विश्रांतीचा विवाह परभणी जिल्ह्यातील शिंगणापूरच्या अशोकशी व्येंकटेश मंगल कार्यालय लोहा येथे संपन्न झाला. या सोहळ्यात बालाजीने वरील सर्व उपक्रम राबवले. लग्नाचे मूळ म्हणून आंबा, चिंच, जांभूळ, रामफळ, लिंबोणी, सीताफळ, आवळा, नारळ, मोगरा या प्रकारच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या फळफुलंझाडांची रोपे सर्वांना भेट दिली. सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व वऱ्हाडी मंडळींना एक ट्रॅक्टर भरून फळझाडांची रोपे सभा मंडपाच्या मुख्य दरवाजा वरच स्वागतासाठी ठेवली. वर्हाडी मंडळींनी लग्न सोहळा संपताच आपल्या शेतात लावण्यासाठी आनंदाने ही फळझाडांची रोपे घरी नेली.

 दुर्लक्षित आणि दुर्मिळ झालेल्या लाल कंधारी गाईला आपल्या बहिणीला बालाजीने आंदण म्हणून दिले. लग्न सोहळ्यास उपस्थित असलेली सर्व वयस्कर मंडळी हा प्रसंग डोळे भरून पाहत होती तर काही ज्येष्ठ मंडळी, आजी-आजोबा या गाईच्या आंदणावर आपल्या पूर्व आठवणी जाग्या करत होती, मंडपात आदंण दिलेल्या गाईचा आणि सर्वत्र फळझाडांच्या रोपांचाच विषय होता. हे डोळे भरून बघता आलं. आपण सुरू केलेला हा उपक्रम आपल्याच डोळ्यांनी बघताना डोळ्यात पाणी येऊ नये काय.

या उपक्रमाचा उद्देश आणि होणारे परिणाम यावर मी  उपस्थितांना मार्गदर्शन केले. लग्न सोहळ्यात अशा प्रकारचे मार्गदर्शन सर्व लग्न मंडप शांतचित्ताने ऐकत होते कारण बाहेर 45 डिग्री सेल्सिअस तापमान होते. तद्वतच हा विषय त्यांना आपला आणि जिव्हाळ्याचा वाटत होता. हे लग्न सोहळा संपल्यानंतर अनेक वयोवृद्ध बोलन्याची  झुंबड उडाली तेव्हा लक्षात आले.

 कोणी आपल्या शेतात झाडे किती आहेत यावर बोलत होते. तर कोणी हे किती गरजेचे आहे आणि करत राहा असेही मार्गदर्शन करत होती. अर्थात वयस्कर माणसांना या उपक्रमाचा जास्त हेवा वाटत होता आणि आजचा काळ बघता या उपक्रमाची गरजही लक्षात येत होती.

या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक उपक्रमशील व्यक्तीचा सत्कार करण्यात आला. प्रगतशील शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला. 5 कर्तुत्वान आईचा सन्मान करण्यात आला. कर्तृत्ववान उपक्रमशील अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी परभणी, हिंगोली, नांदेड, बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

 या उपस्थितीत प्रामुख्याने निसर्ग शाळेचा आणि या संकल्पनेचा प्रमुख म्हणून मी होतो. त्याचबरोबर कृषी विद्यापीठाचे डॉ. दिगंबर पटाई, संघवी साहेब, कृषी अधिकारी सुरेश काळे, अशोक टाकले, प्रगतशील शेतकरी विश्वनाथ होळगे, पंडितराव थोरात, प्रकाश हाळकर, जनार्धन आवरगंड, रामेश्वर साबळे, गोविंद दुधाटे पैलवान, रत्नाकर ढगे, प्रताप काळे, गजानन अंभोरे, बबनराव देशमुख, सुदामराव माने रामदास गवते प्रल्हाद कधांरकर डॉ सुणील लोखंडे या उपक्रमशील व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला.

 अशा प्रकारचे पर्यावरण पूरक व शेतीनिष्ठ विवाह सोहळे हेच पुढील काळासाठी महत्त्वाचे आहेत. अशा उपक्रमातून आपल्या जीवनातील नैसर्गिक आणि आर्थिक दुष्काळ निवारण होऊ शकते म्हणून प्रत्येक जाणकार सुशिक्षितांनी उत्सव सोहळ्यांमध्ये ही विकासाची पावले उचलावी असे वाटते.बाकी तुमच्या हातात आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य आहे ते घडवायचे की मडवायचे हे तुम्हीच ठरवा.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या