🌟पुर्णा तहसिल समोर पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी व्हाईस ऑफ मिडियाच्या वतीने धरणे आंदोलन संपन्न...!


🌟पत्रकारीतेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्याची मागणी🌟


पुर्णा (दि.११ मे २०२३) :- पत्रकार आणि पत्रकारितेसाठी देशपातळीवर कार्य करणाऱ्या व्हाईस ऑफ मिडिया च्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तारीख ११ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० ते ०१.०० वाजे दरम्यान संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर पत्रकारांच्या प्रमुख सहा मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.त्याच अनुषंगाने पुर्णा तहसील कार्यालयासमोर देखील व्हाईस ऑफ मिडिया पुर्णा शाखेच्या वतीने " पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारीतेत ५ वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी,वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जी एस टी रद्द करावा, पत्रकारांच्या घरासाठी विशेष बाब म्हणून शासकीय भुखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जिव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यांचा मयत पत्रकारांच्या कुटूंबाचे पुर्नवसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही माध्यम (ब वर्ग) दैनिका इतक्या जाहीराती देण्यात याव्यात या मागणीसाठी हे धोरण आंदोलन करण्यात आले.यामध्ये व्हाईस ऑफ मिडियाचे तालुकाध्यक्ष आनंद ढोणे पाटील,उपाध्यक्ष गजानन नाईकवाडे,सय्यद सलीम,कार्याध्यक्ष नारायण सोनटक्के, सरचिटणीस सुशिल गायकवाड,सरचिटणीस शिवबाबा शिंदे, कोषाध्यक्ष ज्ञानदेव बोबडे,प्रसिद्दी जनार्दन आवरगंड, संघटक संतोष कऱ्हाळे,कार्यवाहक संजय पांचाळ,सदस्य दिपक साळवे, विठ्ठलराव कदम,नवनाथ पारवे, विष्णू चापके, कृष्णा काळे सहभागी होते तर त्यांना पत्रकार अनिल अहिरे दर्जा महाराष्ट्र न्युज चॅनेल,विजय सोनूले मराठी नाऊ यांनी पाठिंबा देवून सहकार्य केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या