🌟पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती सत्तेची सुत्र सहकार क्षेत्रातील किंग शिवसेना नेते बालाजी देसाई यांच्या हातात....!


🌟सभापती पदावर पुन्हा बालाजी : बालाजी खैरे यांची सभापती पदावर तर उपसभापती पदी रूक्‍मीनबाई पिसाळ यांची निवड🌟 


पुर्णा (दि.२५ मे २०२३) - पुर्णा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेची सुत्र सहकार क्षेत्रातील किंग पुर्व सभापती तथा शिवसेना नेते बालाजी रामराव देसाई यांच्याच हातात गेल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदावर पुन्हा एकदा बालाजीच विराजमान झाल्याने सहकार क्षेत्रातील किंग पुर्व सभापती बालाजी देसाई यावेळी सुध्दा कृषी उत्पन्न बाजार समितीत किंग मेकर ठरल्याने विरोधकांच्या छातीत धडकी भरल्याचे दिसत असून पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदावर बालाजी रामराव खैरे यांची तर उपसभापतीपदी रूक्‍मीनबाई मारोतराव पिसाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. 


पुर्णा बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीची निवड करण्यासाठी आज गुरूवार दि.२५ मे २०२३ रोजी गुरुवारी पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात नवनिर्वाचीत संचालकांच्या  विशेष बैठकीचे आयोजन पुर्णेचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी माधवराव बोथीकर यांच्या विशेष उपस्थितीत घेण्यात आली यावेळी झालेल्या कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील मातब्बर राजकारणी तथा सहकार क्षेत्रातील किंग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित असलेले पुर्व सभापती बालाजी रामराव देसाई (बिआर) यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने १८ पैकी तब्बल १५ जागा पटकावून स्पष्ट बहुमत मिळवले होते सभापती पदासाठी बालाजी रामराव खैरे व कमलाबाई रमेश काळबांडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता परंतु कमलाबाई रमेश काळबांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतल्यामुळे बालाजी रामराव खैरे यांची सभापती पदावर निवड बिनविरोध झाली तर उपसभापती पदासाठी रूक्‍मीनबाई पिसाळ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्यामुळे दोन्ही पदाची निवड बिनविरोध पार पडली यावेळी निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या