🌟गंगाखेड विधानसभेचे चाणाक्ष व दृढनिश्चयी आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचा राजकीय डाव अखेर यशस्वी...!


🌟गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदावर साहेबराव भोसले तर उपसभापती म्हणून संभाजीराव पोले यांची वर्णी🌟 


महाराष्ट्राला बेरजेच्या राजकारणाची परंपरा आहे तीचं परंपरा पुढे नेत गंगाखेड विधानसभेचे चाणक्ष व धोरणी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी राजकीय डाव टाकून गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत किंगमेकर ठरले आहेत. त्यांच्या नियोजनबध्द धोरणांमुळे ११ संचालक मंडळ जुळविता आले.‌ त्यामुळे सभापती म्हणून साहेबराव भोसले तर उपसभापती म्हणून संभाजीराव पोले यांची वर्णी लागली आहे. परिणामी, आ.डॉ.रत्नाकर‌ गुट्टे साहेब यांच्या राजकीय चालीची गावखेड्यात चर्चा सुरू आहे.


याप्रसंगी लाडके व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी गुलाल उधळत पदयात्रा काढण्यात आली. तसेच मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती, सर्व संचालक, राष्ट्रीय समाज पक्ष, आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्र मंडळाचे सर्व पदधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सरपंच, सदस्य, शेतकरी, व्यापारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या