🌟पुर्णेत चारचाकी वाहनाने पाठलाग करीत आलेल्या सडक सख्या हरीने केला रस्त्याने जाणाऱ्या विवाहीत महिलेचा विनयभंग....!


🌟महिलेच्या तक्रारीवरून आरोपी सडकसख्या हरीवर पुर्णा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल🌟


पुर्णा (दि.२० मे २०२३) - पुर्णा शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरातून आपल्या आई सोबत जात असलेल्या एका २७ वर्षीय विवाहीत महिलेचा आपल्या निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या सडकसख्या हरीने मान हलवत अश्लिल इशारा करीत चारचाकी साईडला उभी करीत खाली उतरून हात धरत विनयभंग केला यावेळी घाबरलेल्या पिडीत महिलेने कसाबसा आपला हात सोडवून आटो बोलवून आपल्या आईसोबत घराकडे जाण्यास निघाली असता या प्रकरणातील आरोपीने आपली कार भरघाव वेगाने आटोच्या मागे पळवून ओरटेक करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना काल शुक्रवार दि.१९ मे २०२३ रोजी दुपारी ०३-३० वाजेच्या सुमारास घडल्यामुळे या परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या संदर्भातील घडलेला घटनाक्रम पिडीत महिलेने आपल्या पतीस सांगितल्यानंतर दोघांनीही पुर्णा पोलिस स्थानकात तात्काळ हजर होऊन घटने संदर्भात रितसर फिर्याद दिली पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी शेख जाहेद उर्फ गोलु ताहेर कुरेशी राहणार दयानंद चौक पुर्णा याच्या विरोधात कलम ३५४,३३४ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेतील आरोपी विरोधात या अगोदर देखील पोलिस स्थानकात कलम ३७६,३५४ सारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समजते..... टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या