🌟पुर्णा शहरातील लोकमान्य टिळकरोड येथील रशीद खान पठाण यांचे दुःखद निधन...!


🌟त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुल आणि तिन मुली नातवंड असा मोठा परिवार आहे🌟

पुर्णा (दि.१८ मे २०२३) - पुर्णा शहरातील लोकमान्य टिळकरोड परिसरातील अत्यंत मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे प्रतिष्ठित नागरिक रशीद खान पठाण यांचे आज गुरुवार दि.१८ मे २०२३ रोजी मध्यरात्री ०१-०० वाजेच्या सुमारास वयाच्या ६५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.

शहरासह संपूर्ण तालुक्यात सर्व धर्मिय तसेच समाजात अत्यंत मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणारे रशीद खान पठाण हे शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सिकंदर खान पठाण यांचे इव्हाई होते.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुल माजीद खान रशीद खान पठाण व जाँबाज खान रशीद खान पठाण यांच्यासह तिन मुली नातवंड असा परिवार आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे....इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व खान परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हिच इश्वरा चरणी प्रार्थना.....     


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या