🌟परभणी जिल्ह्यात सात तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' आजपासून प्रारंभ.....!


 🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे उद्घाटन🌟


परभणी (दि.०१ एप्रिल) : सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा नजिकच्या रुग्णालयात मोफत मिळाव्यात, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यात आजपासून ३४२ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ' आपला दवाखाना' सुरु करण्यात आले आहेत. त्यामध्ये परभणी महानगरपालिकेच्या राजाराणी मंगल कार्यालयातील दवाखान्यासह इतर सहा दवाखान्यांचा समावेश आहे. 


 
जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उप विभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार गणेश चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत आणि मुख्य लेखा अधिकारी मनोज गम्मड आदी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 'आपला दवाखाना'चे कार्यान्वयन होणार आहे. या रुग्णालयामध्ये दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत बाह्यरुग्ण सेवा मोफत मिळणार आहेत. औषधोपचार, प्रयोगशाळेत आरोग्यविषयक तपासणी, टेलीकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, ओपीडी व किरकोळ आजारावर उपचार, डायबिटीज, रक्त दाब, कर्करोग अशा असंसर्गजन्य आजारांवर प्राथमिक उपचार, मुखरोग मार्गदर्शन, वयोवृद्धांवर उपचार, जळीत व अपघातजन्य किरकोळ उपचार, मानसिक रोगांवर मार्गदर्शन व उपचार, आयुष आणि योगा यासह सर्व प्रकारचे शासकीय लसीकरण मोफत करण्यात येणार आहेत.

शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागात अंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे १५ वा वित्त आयोगांतर्गत स्थापित होत आहेत. नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू झाली आहे. राज्यातील शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी वेळेवर व भक्कम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा केली केली होती. आजपासून हे दवाखाने नागरिकांच्या सेवेत समर्पित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात परभणी जिल्ह्याच्या ७ तालुक्यांमध्ये दवाखाने सुरू झाले आहेत. त्या अनुषंगाने राज्यात ३४२ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्राचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत आज सुरू झाले आहेत.

* आजपासून सुरु होणारे जिल्ह्यातील आपला दवाखाना ठिकाणे :-

परभणी - आपला दवाखाना, राजा राणी मंगल कार्यालय, परभणी, पूर्णा - आपला दवाखाना,जुनी नगर परिषद इमारत, पूर्णा, गंगाखेड- आपला दवाखाना,गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या बाजूस, टेलिफोन ऑफिसच्या मागे, गंगाखेड, सोनपेठ- आपला दवाखाना, जुनी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, सोनपेठ, पाथरी -आपला दवाखाना,अझीज मोहल्ला, बाजार चौक, पाथरी, सेलू -आपला दवाखाना, हेमंतनगर, सेलू, मानवत - आपला दवाखाना, बौद्धनगर, जिल्हा परिषद शाळा इमारत, मानवत....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या