🌟राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना...!


🌟परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज करावेत🌟

परभणी (दि.३० मे २०२३) : राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याज परतावा देशांतर्गंत व परदेशी उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेत संपूर्ण कर्जसंबंधीत बँकेमार्फत दिले जात असून, विद्यार्थ्यांने बँकेच्या कर्जाची परतफेड नियमितपणे केल्यास १२ टक्केपर्यंत व्याज परतावा रक्कम दरमहा महामंडळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. ही योजना ऑनलाईन स्वरुपात असून, त्यासाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org.in या संकेतस्थळावर मूळ कागदपत्रे अपलोड करून प्रस्ताव ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक  एस.एन. झुंजारे यांनी केले आहे. 

या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, परभणी येथे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे....!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या