🌟राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष व्यंकटेशन जी.यांचा दोन दिवसीय दौरा....!


🌟सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथे जावून मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांची घेणार भेट🌟 


परभणी (दि.२३ मे २०२३) : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष व्यंकटेशन जी. हे दोन दिवसांच्या परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज मंगळवार, दि. २३ मे २०२३ रोजी रात्री परभणी येथे आगमन होईल व मुक्काम करतील. 

आयोगाचे अध्यक्ष व्यंकटेशन जी. हे बुधवार, दि. २४ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. आणि आयुक्तांसोबत भाऊचा तांडा, ता. सोनपेठ येथे जावून मृत सफाई कर्मचा-यांच्या वारसांची भेट घेतील. 

त्यानंतर ते मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्याधिकारी यांच्यासोबत दुपारी १२ वाजता सफाई कर्मचाऱ्यांबाबत आढावा बैठक घेतील. त्यानंतर श्री. व्यंकटेशन जी. हे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी  व मुख्याधिकारी यांच्यासोबत दुपारी ३ वाजता सफाई कर्मचाऱ्यांबाबत आढावा बैठक घेतील. त्यानंतर ते सायंकाळी ६ वाजता औरंगाबादकडे प्रयाण करतील.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या