🌟बहुआयामी संवेदनशील व्यक्तिमत्व आदरणीय जगदीश जोगदंड सर....!


🌟आदरणीय जगदीश जोगदंड सर यांना आयु आरोग्य बल वैभव प्राप्त होवो ही मनोकानाश्रीकांत हिवाळे

आदरणीय जगदीश जोगदंड सर यांचं समस्त जिवन आणि कार्य समाजा समोर प्रेरणादायी स्पुर्तिदायक दिशादर्शक आहे ऐक आदर्श संस्कारक्षम विद्यार्थी प्रिय शिक्षक निर्भीड निरपेक्ष संवेदनशील पत्रकार जेष्ठ रंग कर्मी उत्कृष्ट  सूत्रसंचालक प्रभावी अभ्यासू वक्ता आदर्श समाज सेवक मैत्री विश्वातील अनभिषिक्त सम्राट या सर्वा पेक्षा ते good balanced human being आहेत.

निगर्वी निर्मोही स्थितप्रज्ञ असलेले जोगदंड सर यांनी आपल्या कर्तुत्वाचा आगळा वेगळा ठसा समाज मनावर उमटवला आहे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विशुद्ध मानवतेवर प्रेम त्यांचं प्रेम आहे सर्व जाती धर्मातील व सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रा तील गण मान्य महानुभाव यांच्या सोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.


सरांचा दिनांक ३१ मे हा सेवा निवृत्ती  दिवस आहे.साडेतीन दशकाच्या प्रदीर्घ सेवेतून सर सेवानिवृत्त होत आहेत.शाळेला सुट्याला गण्या अगोदर त्यांनी वर्गावर तास घेतल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली.प्रत्येक विद्यार्थिनी कडे सरांचे लक्ष होते त्यांची शिकवण्याची साधी सरळ सोपी पद्धत त्यांचा विषयाचा व्यासंग विद्यार्थिनींना  बोलत करण्याचं कसब बोलण्याची शिकवण्याची ओघवती शैली खरोखर अद्वितीय अशी होती.सरांचा हा शेवटचा तास होता.

सर आता सेवानिवृत्त होत आहेत.या कल्पनेने विद्यार्थिनी ना गहिवरून आले.त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं किती हृदय स्पर्शी असत हे आदरणीय जगदीश सरानी कृतीतून सिद्ध करून दाखवलं शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक संस्था चालक यांच्या सोबत त्यांचे जिव्हाळ्याचे राहिले कर्तव्याला त्यांनी प्रथम प्राधान्य दिले नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रनेत्या जागतिक कीर्तीच्या पर्यावरण वादी मॅगसेसे पुरस्कार प्राप्त आदरणीय मेधाताई पाटकर पूर्णा श हरा मध्ये व्याखाणा साठी आल्या होत्या त्यांची राहण्याची व्यवस्था माजी उपनगराध्यक्ष न.प. गट नेते उतम्म भय्या खंदारे यांच्या  तथागत रेस्ट हाऊस वर केली होती.पूर्णा शहरातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या भेटी घेत होते मी जोगदंड सरा ना फोन केला सर आदरणीय मेधाताई यांना भेटण्यासाठी आपण यावं आपण जेस्ट पत्रकार आणि दैनिक सकाळ या आघडी च्या वर्तमान पत्राचे तालुका प्रतिनिधी आहात.

ताईच्या कार्यक्रमाची यथोचित प्रसिद्धी आपल्या माध्यमातून देता येईल.परंतु सर शाळे मध्ये परीक्षांच्या महत्वाच्या कामा मध्ये असल्या मुळे त्यांनी इच्छा असून टाळले.परीक्षा विभाग त्यांच्या कडे होता इतकं त्यांनी आपल्या कर्तव्याला महत्व दिले गेल्या तीन दशकंपासून ते पत्र करिते मध्ये आहेत सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रा मध्ये सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या महानुभाव गण मान्य व्यक्तिमत्व ची यथोचित प्रसिद्धी दैनिक सकाळ या दैनिका मधून करत असतात समाजातील शोषित पीडित वंचित कष्टकरी शेतकरी यांच्या न्याय मागण्या ची त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायच परिमार्जन वाचा फोडण्याचे काम ते करत असतात.यश वंत गुणवंत कीर्तिवंत त्यांचा कर्यालां प्रसिद्धी ते देत असतात.

चांगल्या अधिकारी कर्मचारी यांच्या कार्याची दखल व कौतुक करायला ते विसरत नाही.भ्रष्टाचारी दांभिक वृत्तीवर ते आपल्या लेखणीतून प्रहार करतात.ऐक आजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण मराठ वड्या मध्ये त्यांची आगळी वेगळी ओळख आहे.

उद्या ३१ मे २०२३ रोजी सरांचा सेवानिवृत्ती गौरव समारंभ.

जिल्ह्याचे खासदार माननीय संजय जाधव शिक्षक आमदार विक्रम काळे सुप्रसिद्ध कवी प्रा.इंद्रजीत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या मंगल प्रसंगी आदरणीय जगदीश जोगदंड सर यांना आयु आरोग्य बल वैभव प्राप्त होवो ही मनोकाना....!

शुभेछुक

श्रीकांत हिवाळे सर

अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा 

त्यांच्यावर सर्व स् शुभेच्छांचा मोठ्या प्रमाणावर वर्षाव होत आहे.

माझेही सर अगदी जिवलग मित्र आहेत माझ्या सुख दुःख व आनंदाच्या प्रसंगी अंतकरण पूर्वक ते सहभागी होतात.या मंगल प्रसंगी त्यांना व कुटुंबाला आयु आरोग्य बल वैभव प्राप्त होवो ही मनो कामना.

शुभेच्छुक 

श्रीकांत हिवाळे सर

अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका पूर्णा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या