🌟चारित्र्य प्रमाणपत्र : बेरोजगारी दुर करण्याच्या दृष्टीने रोजगार मिळवण्यासाठी की वैवाहिक जिवनाची सुरुवात करण्यासाठी ?


🌟सकाळची वेळ एक ओळखीचा तरुण अचानक भेटला म्हणाला चारित्र्य प्रमाणपत्र काढायचे काय करावे लागेल ?🌟

✍🏻लघु कथा - चौधरी दिनेश (रणजीत)

सकाळची वेळ एक ओळखीचा तरुण अचानक भेटला म्हणाला चारित्र्य प्रमाणपत्र (character certificate) काढायचे काय करावे लागेल ?

यावर मी त्याला सहजच विचारले बेरोजगारी दुर करण्याच्या दृष्टीने रोजगार मिळवण्यासाठी की वैवाहिक जिवनाची सुरुवात करण्यासाठी ? यावर तो खळखळून हसला म्हणाला कशाला मजाक करता साहेब...मला नौकरीसाठी अर्ज करायचा आहे त्या करीता आवश्यकता आहे चारित्र्य प्रमाणपत्राची अरे पण त्यानंतर तुला वैवाहिक जिवणात प्रवेश करण्यासाठी मुलगी बघतांना लागेलच ना चारित्र्य प्रमाणपत्र ? तुला सद्या कोणता कामासाठी हवय ते सांग जर विवाहासाठी लागत असेल तर सरळ मुली कडच्या लोकांना समाजातील 'स्वतःचे ठेवायचे झाकून अन् इतरांचे पाहायचे वाकून' अश्या निच प्रवृत्तीच्या चांडाळ चौकडीकडे जाण्यास सांग ते चारित्र्यहिन हलकट लोक तुझे चारित्र्य प्रमाणपत्र तात्काळ मुलीकडच्या पाहुण्यांना बहाल करुन टाकतील....

माझ्या या बोलण्यावर तो पुन्हा खदखद हसला 😀 आणि म्हणाला अहो साहेब मला चारित्र्य प्रमाणपत्र विवाहासाठी नाही तर नौकरीसाठी काढायच आहे.

यावर मी पुन्हा त्याला सहजच मजाक करण्याच्या दृष्टीने म्हणालो...अरे मला नाही वाटत तुला या जन्मात नौकरी मिळेल तरी सुध्दा एक काम कर पांढऱ्या शुभ्र खादीतला गल्ली बोळातला एखादा दिडदमडी छाप पुढारी कम अन् दलाल ज्यादा अश्या एखाद्या एजंटाला (दलाल) तात्काळ संपर्क साधून त्याच्या मार्फत चारित्र्य प्रमाणपत्र काढून घेण्याचा प्रयत्न कर अरे लागतील थोडेफार पैसे परंतु चारित्र्य प्रमाणपत्र वेळेवर मिळेल शेवटी त्याच्या शिफारशी मुळे मिळालेल्या चारित्र्य प्रमाणपत्रामुळे शासकीय नौकरी मिळाली नाही तरी त्याच्या वेळेवर धावून आल्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून 'बिन पगारी फुल्ल अधिकारी अन् रात्रंदिवस वेठविगारीची (गुलामी)' नौकरी नक्कीच तुला प्राप्त होईल अन् मग तुला तुझ्या चारित्र्याची खरी किंमत कळेल ? नाही काही तर आई-वडिलांच्या कष्टाच्या कमाईचे घरचे एकवेळचे जेवन तरी वाचेल ? कारण त्याला माहीत आहे याच्यासाठी केवळ एकवेळ धावून गेल्यावर हा आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली कायमचा दबून जिवनभर गुलामच राहणार अन् शेवटी खाऊन खाऊन काय खाणार...दोन तिन रोट्या...दोन चार पोल्ट्रीच्या खमंग बोट्या अन् एखाद दोन जयसवाली अमृताच्या घुट्या..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या