🌟परभणी येथे उद्या दि.१७ मे रोजी बास्केटबॉल शिबिराचे आयोजन...!


🌟बास्केटबॉल प्रकारात करियर करण्यासाठी ही सुवर्णसंधी - जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार

 परभणी (दि.१६ मे २०२३) :  जिल्ह्यातील युवा बास्केटबॉल खेळाडूंना तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात तंत्रशुद्ध बास्केटबॉलच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बुधवार दि.१७ मेपासून पंधरा दिवसांसाठी केले आहे.बास्केटबॉल प्रकारात करियर करण्यासाठी ही सुवर्णसंधी असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा बास्केटबॉल संघटना, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. प्रशिक्षण बुधवार दि. १७ ते ३१ मेदरम्यान सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे आयोजित करण्यात आले असून, एक जून रोजी सकाळी ९ वाजता बास्केटबॉल सामने होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. पवार यांनी सांगितले आहे.

मुलांना बास्केटबॉल खेळाडू घडविण्यासाठी सातव्या वर्षापासून सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून त्यांची शारीरिक क्षमता दहा वर्षापर्यंत सिद्ध होईल. या खेळाचे कौशल्य दहा ते बारा वर्षामध्ये पूर्ण होईल व त्यानंतर खेळाडू म्हणून शालेय व फेडरेशन स्पर्धांमधून सातत्याने सहभागी होत नावलौकिक वाढवू शकतील, हा या विशेष शिबीर घेण्यामागचा मुख्य हेतू असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

साधारणत: बास्केटबॉल खेळाडूंना शालेयस्तरावर १३ ते १९ वयोगटापर्यंतच्या स्पर्धामधून, पदवी व पदव्युत्तर कालावधीत विद्यापीठ स्तरावर, व इतर संघटना, फेडरेशनमार्फत मार्फत होणाऱ्या विविध स्तरावरील स्पर्धांमधून खेळत शेवटी आंतरराष्ट्रीय स्पर्धत खेळण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या विशेष शिबिराच्या माध्यमातून मुलांना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या संधीचा जास्तीत-जास्त खेळाडूंनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. पवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पी. एन. पंडित (८७८८५२५३७४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या