🌟पुर्णेतील श्री गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालयाच्या मैदानात १५ दिवसांचे उन्हाळी शिबीर संपन्न....!


🌟शरीर लवचिक ठेवण्याची सवय बालपणीच मुलांना लावली तर शरीर निरोगी व तंदरुस्त राहते - धरमसिंह बायस

पुर्णा (दि.०८ मे २०२३) - नियमित योग्य वेळी योग्य प्रकारे शारीरिक हालचाली करुन शरीर लवचिक ठेवण्याची सवय बालपणीच मुलांना लावली तर निरोगी तंदरुस्त राहतात असे आवाहन पूर्णा तालुका क्रीडा प्रमुख धरमसिंह बायस यांनी केले. 

         येथील श्री गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालयाच्या मैदानात उन्हाळी शिबीर १५ दिवसाचे ठेवण्यात आले होते या शिबिराचा रविवार दि.०७ मे २०२३ रोजी समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा प्रमुख धरमसिंग बायस बोलत होते कार्यक्रमास प्रशिक्षक शंभु गायकवाड,प्रा.सतिश बरकुंटे,एन.सी.सी.गाईड पुरुषोत्तम जाधव , लंगडी आट्या पाट्या मार्गदर्शक सज्जन जयस्वाल अदीची प्रमुख उपस्थिती होती शिबीरात दि.२२ एप्रिल ते (ता . ०७ ) मे च्या शिबीरात सकाळी ६ पासुन पुरक  व्यायाम , धावणे , लांब उडी ,उंच उडी ,लंगडी , सुरपाट , व्हालीबॉल , बास्केटबॉल , बॅडमिंटन अदी नियमित खेळ प्रकार  घेतले  गेले  . सर्व खेळप्रकारातुन खेळाडूमध्ये स्पर्धा घेत कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले . गोल्डपदक , सिल्वरपदक , कास्यपदक अशी वेदांत  अग्रवाल , उदय जोगदंड ,जीत बायस  , अमय ठाकूर , धनंजय खाकरे , आर्यन जाधव अर्णव जयस्वाल यांच्यासह इतर स्पर्धेकाना पदके देण्यात आली .पुढे बोलतांना मार्गदर्शक शंभु गायकवाड म्हणाले "शुगर झाल्यावर  खुप व्यक्ती वांकिग करतात मात्र होवु नये म्हणून कोणीच व्यायाम करत नाहीत . उन्हाळी शिबीराच्या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . सतिश बरकुंटे यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या