🌟भगवान बुद्धांचे मानव मुक्तीचे विचार संपूर्ण जगासाठी दिशादर्शक......!


🌟भदंत प्राचार्य डॉ.खेमोधम्मो महाथेरो यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा (दि.05 मे 2023) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णाच्या वतीने अखिल भारतीय भिकू संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत पैय्यावंश यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे सचिव माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे व जयंती मंडळाचे पदाधिकारी यांच्या संयोजनाखाली आज शुक्रवार दि.05 मे 2023 रोजी भगवान तथागत बुध्द जयंती निमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.


सकाळच्या सत्रामध्ये बुद्ध विहारांमध्ये परित्राण पाठ त्रिरत्न वंदना घेण्यात आली.सकाळी साडेनऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्यामराव जोगदंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी अखिल भारतीय भिकू संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव भदांत डॉ. उपगुप्त महा थेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी जाहीर धम्म देशनेचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक उद्योजक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड हे होते प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू  नायब तहसीलदार मस्के पंचायत समिती  सहाय्यक लेखा अधिकारी संजय पाठक विद्युत मंडळाचे उपकार्यकारी अभियंता अधिकारी श्याम कांत खोडपे सहाय्यक अभियंता पंडित राठोड संभाजीनगरचे महिला व बालकल्याण विकास अधिकारी रणधीर तेलगोटे  आदींची उपस्थिती होती.

यावेळी आपल्या प्रमुख धम्मदेशनेमध्ये भदंत प्राचार्य डॉक्टर खेमोध म्मो आपल्या अभ्यासपूर्ण धम्मदेशनेमध्ये बुद्ध धम्म तत्त्वज्ञानाची महती विशद करताना सांगितले बुद्ध धम्म तत्त्वज्ञानामध्ये महान मानवी मूल्य आहेत जगामध्ये शांतता सुव्यवस्था व जगाचे सर्वांगीन कल्याण करण्याचे सामर्थ्य बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये आहे.याप्रसंगी जयंती मंडळाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे यांनी मानवी जीवनामधील दुःख दूर करण्याच सामर्थ्य बुद्ध विचारांमध्ये आहे दुःखाचे कारण तृष्णा आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड यांनी भिकू संघाच्या त्याग सेवा समर्पण सेवाभाव धम्म प्रचार आणि प्रसारामध्ये त्यांचे योगदान यावर भाष्य केले भिकू संघाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये नितांत आदराची भावना असली पाहिजे यावेळी आज यावेळी स्मृतीशेस सचिन (अप्पा) धबाले  व राहुल गायकवाड मित्र मंडळ पूर्णा यांच्या वतीने  खीर दान करण्यात आले.

दुपारी एक वाजता वाद्य वृंदा सह रथामध्ये सजवलेल्याबुद्ध मूर्तीची शहराच्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये त्रिशरण पंचशील व आशीर्वाद गाथेने समारोप झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभा धम्म सेवेमध्ये करत असलेल्या महिला मंडळांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे बौद्धचार्य त्र्यंबक कांबळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या