🌟पुर्णा नगर परिषदे अंतर्गत पंतप्रधान आवास/रमाई आवास योजनेतील धनादेशाचे मनमानी पध्दतीने वाटप ?


🌟परभणीतील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे उपोषण उपोषण अखेर सुटले : योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन🌟

पूर्णा (दि.०१ मे २०२३) - पुर्णा नगर परिषद अंतर्गत पंतप्रधान व रमाई आवास घरकुल योजनेत स्थळ पाहाणी न करता संबंधित अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने धनादेश वाटप झाले. तसेच अनेक कामात अनियमितता झाली आहे, असा आरोप करून आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे पूर्णा शहराध्यक्ष माजी नगरसेवक मुकूंद विठ्ठल भोळे, मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे तालुकाध्यक्ष अंकुश बालाजी मांजरे, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव मुंजाजी सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परभणी येथे उपोषण सुरू केले होते.

त्याची माहिती मिळताच गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी उपोषण स्थळी भेट दिली. त्यानंतर अधिकारी व उपोषणकर्ते यांची चर्चा घडवून मध्यस्थी केली त्यामुळे उपोषणातील सर्व मागण्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून मिळाल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.

यावेळी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्यासह मित्रमंडळाचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, जिल्हासरचिटणीस रवी कांबळे, जिल्हा संपर्क संपर्कप्रमुख संदीप माटेगावकर,तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूदेव मुंडे, माजी नगराध्यक्ष मुकुंद भोळे, जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी, मित्रमंडळाचे पदधिकारी, कार्यकर्ते व उपोषणकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या