🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟कर्नाटकमध्ये महागाई आणि बेरोजगारीची दहशत'; प्रियंका गांधींचा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार नितेश राणे यांचा दावा

* गुजरातमध्ये गेल्या पाच वर्षात 41 हजाराहून अधिक महिला बेपत्ता, NCRB च्या अहवालात 'द गुजरात स्टोरी'ची हकीकत

* ग्लोबल वॉर्मिंगमुळे 82 टक्के भारतीय चिंतेंत, अहवालातून झाले स्पष्ट

* काही न्यायाधीश निवृत्त होणार त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच, उज्वल निकम यांनी व्यक्त केली अपेक्षा

* बेदाणा उत्पादकांना टनाला लाख रुपये अनुदान द्या; स्वाभिमानीचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

* कर्नाटकमध्ये महागाई आणि बेरोजगारीची दहशत'; प्रियंका गांधींचा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल

* संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अद्रकला (आल्याला)  17 हजारांचा भाव मिळाल्याने चक्क डीजे लावुन केला आनंद साजरा, ओ सेठ, तुम्ही नादच केलाय थेट हे गाणे लावुन शेतकऱ्यांने आपल्या शेतमजूर व मित्रांसोबत केला डान्स  

* अमेरिकेतल्या टेक्सासच्या शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार, 8 जण ठार तर 7 जखमी

* प्रजासत्ताकदिनी स्त्री शक्तीचा जागर; 'परेड-परफॉर्मन्स'सह सर्व उपक्रमांमध्ये महिलांचाच सहभाग, सरंक्षण मंत्रालयाने दिले आदेश

* भारतात 'द केरळ स्टोरी' बनवणं सोपं नाही! काश्मिर फाईल्सच्या अग्निहोत्रींकडून कौतूक

* मणीपुरमध्ये अडकवलेल्या विद्यार्थ्यांना विमानाने आणनार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती 

* अभिमानास्पद : सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार

* भाजपसह एकनाथ शिंदेंवर आदित्य ठाकरेंची जोरदार टीका, म्हणाले - ते बेकायदेशीर मुख्यमंत्री

* पुलवामामध्ये मोठा दहशतवादी हल्ला टळला, 5-6 किलो IED सह एका दहशतवाद्याला अटक

* सोशल मीडियावरील तक्रारींनंतर बोरिवली आणि वांद्रे भागात रहदारीच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या 200 हून अधिक ऑटो-रिक्षा चालकावर कारवाई

* राज्यातील धरणांत केवळ 36 टक्के पाणीसाठा शिल्लक, पाण्याचे नियोजन करण्याची गरज

* कर्नाटकमध्ये कर्तव्यावर असलेल्या छत्तीसगड पोलिसाचा अंबोली घाटात दरीत कोसळून मृत्यू

* सोलापूर येथील युवा संशोधक  राहुल बुऱ्हाणपुरे यांनी वाहनांपासून होणारे प्रदूषण कमी करणारे उपकरण केले तयार*

* सोलापूर येथील युवा संशोधक इंजिनिअर राहुल बुऱ्हाणपुरे यांनी  चारचाकी वाहन क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी तयार केलेल्या उपकरणाचं पेटंट टाटा कंपनीने तब्बल 13.5 कोटी रुपयांनी विकत घेतलं आहे.

* सोलापूरच्या दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात त्यानं एमसीव्हीसी ऑटोमोबाइल क्षेत्रात शिक्षण घेतलं. घरची अर्थिक स्थिती बेताची असल्याने राहुल यांनी दुचाकी, चारचाकी गाड्या दुरुस्तीचे काम केलं. हे करतानाच गाड्यांनी होणारे प्रदूषण कमी करण्याची कल्पना त्यांना सुचली. अनेक दिवस संशोधन करून त्यांनी गाड्यांमधील प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनवला. इंडियन स्टँडर्डच्या मानांकनानुसार हे उपकरण बनवले आहे. या उपकरणासाठी तीन ते चार कंपन्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला व या पेटंटची मागणी केली. परंतु त्यांनी पेटंट टाटा कंपनीला देण्याचा निर्णय घेतला.

* ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विष्लेशक प्रताप आसबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

* शिवसेना प्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचा प्लॅन बी तयार आहे. बंडखोरांना घड्याळ आणि पक्ष देण्याचा.काही नेत्यांनी शरद पवार यांना गळ घातली भाजप बरोबर जाऊया, शरद पवार यांनी नेत्यांना स्पष्ट सांगितले ज्यांना जायचे त्यांनी जावे

* शरद पवार यांनी राजीनामा दिला,खासगीत चर्चा सुरू झाली भाजप बरोबर जाण्याचा मार्ग मोकळा झाला..पण नेत्यांना संदेश आहे, जायचे तर जा.. भाजपला देखील इशारा आहे..अंगावर घ्यायचे तर घ्या..पवारांनी दाखवून दिले आमदार फुटले तरी पक्ष त्यांच्या बरोबर आहे  - प्रताप आसबे

*अभिजित पाटील पंढरपूरचे २०२४ चे राष्ट्रवादीचे उमेदवार : शरद पवारांचे स्पष्ट संकेत*

* विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना तुम्ही संपूर्ण ताकदीने उभं करा. मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्यावेळी निवडणूक येईल, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा, आमच्या सहकाऱ्यांचा, महाविकास आघाडीचा लोकप्रिय उमेदवार कोण आहे, असा प्रश्न विचारला, तर लोक अभिजितचं नाव घेतील, यासंबंधीची तयारी तुम्ही सुरू करा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूर मंगळवेढ्यातून पाटील यांच्या उमदेवारीचे स्पष्ट संकेत दिले. 

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या