🌟परभणी जिल्ह्यातील पालम येथे अहिल्यादेवी स्त्रीशक्ती समाधान शिबिर संपन्न...!


🌟यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

परभणी (दि.18 मे 2023) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी शक्ती समाधान शिबिर जिल्ह्यात 17 मे ते 30 मे दरम्यान राबविले जाणार आहे. त्यानुसार आज पालम तालुक्यात हे शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यात 512 महिलांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील 408 महिलांनी तक्रारी नोंदविल्या होत्या, त्यापैकी 52 महिलांच्या तक्रारीचे निवारण तात्काळ करण्यात आले तर इतर तक्रारींची कालबद्धता ठरविण्यात आली. सर्व अर्ज ऑनलाइन करण्यात आले.

यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, तालुका विकास अधिकारी श्री. शिशोदे, तालुका शिक्षण अधिकारी श्री. सय्यद, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निरस, ग्रामीण रुग्णालय पालम वैद्यकीय अधिकारी डॉ.खंदारे, कृषी विभागाचे राठोड, पशुसंवर्धन विभागाच्या श्रीमती जाधव, पालम नगरपंचायतचे श्री. कानडे, पालम पोलिस स्टेशनच्या पोलीस उपनिरिक्षक श्रीमती केंद्रे, आयसीडीएसचे संरक्षण अधिकारी श्री. नागलवाड, श्री. ताटे तसेच सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

तहसीलदार श्रीमती गोरे यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर घेण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांचे महिलांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे स्टॉल कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती येरमे यांनी केले होते. परभणी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्त्रीशक्ती समाधान शिबिर दि. 19 मे, 2023 रोजी सकाळी 10 वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, परभणी येथे होणार असून, परभणी तालुक्यातील व शहरातील महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या