🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची आवश्यकता नाही - अजित पवार

✍️ मोहन चौकेकर

* जीएसटीचा नवा नियम येत्या 1 ऑगस्टपासून लागू; आता 5 कोटी रूपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना बिझनेस-टू-बिझनेस व्यवहारांसाठी ई-इनव्हॉइस जारी करणे बंधनकारक 

* मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे ; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

* रस्त्यावर पडणाऱ्या पावसापासून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार, पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचना

* महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-2022 : दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क आणि उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गांचा अंतिम निकाल जाहीर

* बीडमध्ये भाजप कार्यकर्त्याची दादागिरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना शिवीगाळ; अजित पवार थेट पोलीस ठाण्यात

* सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याचा धोका टळला,  राज्यात 21-26 मे दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता - आमदार बच्चू कडू 

* सीबीएसईचा दहावी व बारावीचा निकाल जाहीर, दहावीचा निकाल 87.33 टक्के तर बारावीचा निकाल 93.12 टक्के 

* परभणीतील सोनपेठ शहरानजीक भाऊचा तांडा येथे काल सेप्टिक टॅंकमधील मैला स्वच्छ करताना 5 जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे निर्देश.

* जयंत पाटील यांनी ईडीला पत्र पाठवून चौकशीची मुदत 10 दिवसांनी वाढवून देण्याची केली मागणी, त्या कंपनी सोबत एक रुपयाचा पण व्यवहारा केला नसल्याचा जयंत पाटील यांनी केला दावा 

* अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SEBI ला सर्वोच्च न्यायालय देऊ शकते 3 महिन्यांची मुदतवाढ; 15 मे रोजी होणार पुढील सुनावणी

* अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खानला दिलासा ; इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून 2 आठवड्यांचा जामीन मंजूर

* 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सभापतींनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा ; उद्धव ठाकरे यांची मागणी

* नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची आवश्यकता नाही - अजित पवार

* काँग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार

* मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांचं निलंबन मागे : अनिल देशमुख प्रकरणात चर्चेत आलेले निलंबित पोलिस अधिकारी परमबिर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आलेलं आहे. तसेच त्यांच्यावरील सर्व आरोप वगळण्यात आले आहेत.

* समीर वानखेडेंवर अटकेची टांगती तलवार : ‘शाहरुख खान याच्याकडे 25 कोटींच्या खंडणीची मागणी, 50 लाख स्वीकारले’, सीबीआयचे गंभीर आरोप, 29 ठिकाणी छापेमारी

* समीर वानखेडे यांनी शाहरुख खान याच्याकडे 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आरोपांप्रकरणी सीबीआयची छापेमेारी सुरु आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

* अभिनेते गौरव मोरे यांना संभाजी ब्रिगेडचा पुरस्कार

* संभाजी ब्रिगेडचा ह्यावर्षीचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२३ हा पुरस्कार विनोदी अभिनेते गौरव मोरे यांना जाहीर करण्यात आला आहे.

* 'द केरला स्टोरी' बंदी प्रकरण: सुप्रीम कोर्टाची पश्चिम बंगाल-तामिळनाडू सरकारला नोटीस; विचारणा - 'द केरला स्टोरी' संपूर्ण देशात सुरू, मग तुम्हाला काय अडचण?

* शेअर बाजार: सेन्सेक्स 123 अंकांनी वाढून 62,027.90 अंकांवर बंद, तर निफ्टी 17 अंकांनी वाढून 18,314.80 अंकांवर बंद

* दिपीका पदुकोणच्या शिरपेचात मानाचा तुरा:* टाईम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दिपिका पदुकोण, हा मान पटकावणारी ठरली सहावी भारतीय सेलिब्रिटी

* ठाण्यात 10 गोडाऊन जळून खाक:* ठाण्यातील भिवंडी परिसरात एका गोदामाला भीषण आग, गोडाऊनमध्ये केमिकल असल्याने स्फोट होऊन 10 गोडाऊन जळून खाक

* ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश; प्रयागराज उच्च न्यायालयाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला आदेश*

* सोन्याचे आजचे दर:* मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 56550 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 61690 रुपये

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या