🌟पुर्णा तालुक्यातल्या ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीत चोर समजून सिकलकरी समाजाच्या ३ युवकांना अमानुषपणे मारहान...!


🌟मारहाणीत एका सिकलकरी युवकाचा जागीच मृत्यू तर अन्य दोन युवक गंभीर जखमी🌟

परभणी/पुर्णा (दि.२७ मे २०२३) - परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील तिनधारा लगतच्या अंदाजे पाच किलोमीटर अंतरावरील उखळद परिसरात आज शनिवार दि.२७ मे २०२३ रोजी मध्यरात्री ०३-०० वाजेच्या सुमारास परभणी तालुक्यातील बलसा खुर्द येथील सिख सिकलकरी समाजातील तिन युवक वराह पकडण्यासाठी साहित्य घेऊन गेले असता त्या युवकांना चोर समजून दोरीने हातपाय बांधून अत्यंत अमानुषपणे झालेल्या मारहाणीत यातील किरपानसिंघ सुजीतसिंघ भोंड याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन युवक गंभीर जखमी झाल्याची मानवतेला काळीमा फासणारी हृदयविदारक घटना घडली असून या घटनेतील तिन्ही युवक अल्पवयीन अंदाजे पंधरा सोळा वर्षे वयोगटातील आहेत.

परभणी तालुक्यातील बलसा खुर्द येथे वास्तव्यास असलेल्या मागासवर्गीय सिकलकरी समाजातील लोक आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लोखंडी कढाई,कांदे कापण्यासाठी वापरल्या जाणारे चाकू,विळ्यांसह अन्य साहित्याची निर्मिती व विक्रीसह वराह पालन देखील करतात दिवसभर आपली पारंपारिक लोखंडी वस्तू निर्मितीची कामे करुन रात्रीच्या वेळी वराह पकडून ती गाड्यांतून भरुन ठोक व्यापाऱ्यांना विक्री करता अश्याच प्रकारातून आज शनिवारी मध्यरात्री वराह पकडण्यासाठी बलसा खुर्द येथील किरपानसिंघ सुजीतसिंघ भोंड,अरुणसिंघ जोगींदरसिंघ टाक,गोरासिंघ उर्फ सचिनसिंघ गुरबच्चनसिंघ दुधाणी हे वराह पकडण्यासाठी उखळद परिसरात गेले असता उखळद गावातून नवागडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गावातील काही नराधमांनी कुठल्याही प्रकारची विचारपुस नकरता अत्यंत अमानुषपणे गंभीर स्वरुपाची मारहाण केली या मारहाणीत किरपानसिंघ सुजीतसिंघ भोंड या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले अरुणसिंघ जोगींदरसिंघ टाक,गोरासिंघ उर्फ सचिनसिंघ गुरबच्चनसिंघ दुधाणी हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना परभणी येथील शासकीय ग्रामिण रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे व घटनेतील एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिस सुत्रांकडून समजते या घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर,अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे,ताडकळस पोलिस स्थानकाचे सपोनि.कपील शेळके यांच्यासह सहकारी कर्मचारी पथकाने परभणी जिल्हा शासकीय सामान्य रुग्नालयाला भेट दिली या दुर्दैवी घटनेतील मयत किरपानसिंघ भोंड या मयताचे शवविच्छेदन करण्यात आले असून या घटनेतील नराधमांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियेसह आरोपींची शोध मोहीम देखील सुरु असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या