🌟नांदेड-परभणी लोहमार्गासह पुर्णा रेल्वे स्थानक बनले गुन्हेगारी प्रवृत्तींसाठी सुरक्षित क्षेत्र : सातत्याने सुरू गंभीर गुन्ह्यांचे सत्र...!


🌟रेल्वे सुरक्षा व्यवस्था निष्क्रिय : गुन्हेगारांच्या बचावासाठी सिसीटीव्ही कॅमेऱ्यांना देखील ठरवले जाते खोटे🌟 


मराठवाड्यातील सर्वात मोठे व महत्वपुर्ण जंक्शन असलेल्या व दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या नांदेड-परभणी या लोहमार्गावरील दोन जिल्ह्यांच्या मध्यभागातील पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकासह नांदेड-पुर्णा-परभणी लोहमार्गाला दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापण प्रशासनाने गुन्हेगार मुक्त संचार क्षेत्र घोषित केले की काय ? असा गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या भयंकर घटना एकामागून एक सातत्याने घडत असतांना दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापण प्रशासनाने लाखो रुपये रुपये खर्चून रेल्वे स्थानकांवरील रेल्वे संपत्तीसह प्रवासी वर्गाच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानक व परिसरात लावलेले सिसीटीव्ही कॅमेरे गुन्हेगारांसह वाढत्या गुन्हेगारीचा विमोड करण्यात शेवटी का अपयशी ठरत असावे या गंभीर बाबीचा शोध घेण्याची देखील आवश्यकता निर्माण झाली आहे.


ब्रिटीश/निजाम काळापासून दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील सर्वात मोठे व महत्वाचे रेल्वे जंक्शन म्हणून मान्यताप्राप्त असलेल्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावर तिन/साडेतीन दशकापुर्वी दमरे विभागाची जवळपास सर्वच उपविभागीय स्तराची कार्यालयांसह हजारो रेल्वे कर्मचारी कार्यरत होते शेकडो एक्कर संपत्तीसह अधिकारी/कर्मचारी वर्गासाठी शेकडो निवासस्थानांसह लोहमार्ग पोलिस स्थानक देखील होते त्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात फोफावलेली नव्हती धावत्या प्रवासी एक्सप्रेस/पॅसेंजर गाड्यांमध्ये तुरळक प्रमाणात गुन्हे घडत होते परंतु दमरे प्रशासनाने पुर्णा रेल्वे स्थानकावरी पोलिस स्थानक नांदेड येथे स्थलांतरीत केल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींसाठी पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकासह संपूर्ण परिसर गुन्हेगार मुक्त संचार क्षेत्र झाल्याचे निदर्शनास येत असून पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकासह परिसरात गुन्हेगार अगदी सहज गुन्हे घडवून हसत खेळत निघून जातांना पाहावयास मिळत असून हा सर्व प्रकार सिसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्यानंतर देखील रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिस प्रशासनाचे अधिकारी/कर्मचारी आपले क्षेत्र नसल्याचा जावाईशोध लावीत प्रवासी वर्गाची हेटाळणी करतांना पाहावयास मिळत असल्यामुळे संबंधित रेल्वे सुरक्षा यंत्रणांचे व गुन्हेगारी प्रवृत्तीचे आर्थिक हितसंबंध संबंध आहे की काय ? असा प्रश्न प्रवासी वर्गाला पडत आहे.


💥दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागा अंतर्गत सन २०२२/२०२३ या काळात घडलेले गंभीर गुन्ह्यांचा घटनाक्रम  :- 

🔴दि.२० सप्टेंबर २०२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पुर्णा रेल्वे पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर तडीपार परिसरात रात्री ०२-०० ते पहाटे ०४-०० वाजेच्या सुमारास हैद्राबाद येथून आलेल्या आरोपी अरबाज खान पठाण या नराधमाने आपल्या १९ वर्षीय पत्नीची अक्षरशः दगडाने ठेचून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती

🔴दि.२९ सप्टेंबर २०२२ रोजी अजमेर-हैद्राबाद सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन नंबर ८६०४५११४ या गाडीत हिंगोली येथून पुर्णेला येणाऱ्या पुर्णा शहरातील हृदयास छिद्र असल्याने बायपास सर्जरी झालेल्या ३० वर्षीय युवक गजानन मुंडीक नामक युवकास चार ते पाच जनांच्या टोळक्याने गंभीर स्वरुपाची मारहाण करीत रेल्वेतून ढकलल्याचा गंभीर प्रकार घडला होता.

🔴दि.०२ मार्च २०२३ रोजी हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या कारवाईत ३८ किलो गांजाची तस्करी केल्या प्रकरणी १४ लाख ६५ हजाराचा मुद्देमालासह पुर्णा लोहमार्ग पोलिस चौकीत कार्यरत पोलिस कर्मचारी रविंद्र अमरसिंग राठोडला ताब्यात घेण्याची कारवाई झाल्यामुळे खळबळ माजली होती त्यामुळे लोहमार्ग पोलिसांच्या विश्वसनीयतेव प्रश्नचिन्ह निर्माण झाला.

🔴दि.२३ मार्च २०२३ रोजी नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या डब्यातील शौचालयात नांदेड येथे सफाई करणाऱ्या कामगारास एका ३५ वर्षीय तरुणीचा  संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना घडली होती त्या घटनेतील मयत महिलेच्या अंगावर गंभीर जखमा आढळल्या होत्या या घटनेत काय तपास झाला हे अद्यापही गुलदस्त्यात.

🔴दि.०९ एप्रिल २०२३ रोजी नांदेड-पुणे एक्सप्रेस मधील बि-०१ आरक्षित डब्यात नांदेड येथून पुण्यास जात असलेल्या दोन विद्यार्थ्यांना परभणी येथील एका नगरसेविकेचा पती असलेल्या व्यक्तीने अक्षरशः उभ्याने लाथा बुक्यांचा मारा करीत जबर मारहान केल्याची घटना घडली होती या घटनेत गंभीर जखमी झालेला एक विद्यार्थी नांदेड येथील रहिवासी व लोकमतचे पत्रकार सुनिल जोशी यांचा मुलगा होता. 

🔴दि.२५ एप्रिल २०२३ रोजी पुर्णा जंक्शन रेल्वे क्र्यु-बुकींग लॉबीत कार्यरत वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट अमोल नाईकवारे यांच्यावर नांदेड लोहमार्ग पोलिस प्रशासनाच्या हद्दीतील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातल्या सिवणगाव रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्टर कार्यालयात हल्लेखोर स्टेशन मास्तर कालुराम मिना याने जिवघेणा हल्ला करीत त्यांना अक्षरशः रक्तबंबाळ केल्याची भयंकर घटना घडली होती.

🔴दि.२६ एप्रिल २०२३ रोजी रात्री १०-०० ते १०-३० वाजेच्या सुमारास भारत सरकार असे लिहिलेलेल्या खाजगी आयशर ट्रक क्रमांक ए.पी.२७ डब्लू ६८२९ हा आरआरसी ग्राऊंड येथून तर बोलोरी पिकअप् जिप ज्या वर भारत सरकार असे लिहिलेल्या जिचा क्रमांक एम.एच.२६ बी.ई.१९४८ ही दि.२७ एप्रिल २०२३ रोजी सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन कार्यालया समोरुन चोरट्यां डिझेलसह ताब्यात घेण्यात आल्याची घटना घडली होती या प्रकरात संबंधित डिझल चोरी प्रकरणातील रेल्वे अधिकारी/कर्मचाऱ्यांना वाचवून दोन ड्रायव्हरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते या प्रकरणात रेल्वे प्रशासनात कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा गंभीर प्रकार समोर आला.

🔴दि.०४ मे २०२३ रोजी सायंकाळी ०६-५० वाजेच्या सुमारास प्लाटफार्म क्रमांक ०४ वरील प्रवेश द्वारालगत प्रतिष्ठित व्यापारी परमानंद प्रभुदयाल ओझा यांना मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी सोबत आणलेल्या लोखंडी रॉड व लाकडी दांडुक्यांनी गंभीर स्वरुपाची मारहाण गंभीर घटना घडली होती सदरील घटना लोहमार्ग पोलिसांच्या क्षेत्रात घडल्यानंतर देखील लोहमार्ग पोलिस स्थानक नांदेडचे पो.नि.सुरेश उनावूने यांनी गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ओझा यांनी केला आहे. 

या घडलेल्या घटनांचा दक्षिण मध्य रेल्वे नांदेड डिव्हीजनच्या विभागीय व्यवस्थापक सन्माननीय निती सरकार यांनी सखोल अभ्यास करून पुर्णा रेल्वे स्थानकासह रेल्वे परिसर तसेच प्रवासी वर्गाच्या सुरक्षा व्यवस्थेला प्राथमिकता देऊन लोहमार्ग पोलिस चौकीत एक सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक तसेच दहा पोलिस कर्मचारी व रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात देखील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी व रेल्वे परिसराला संरक्षण भिंत उभारून या परिसरात प्रवेशबंदीची घोषणा करावी अशी मागणी प्रवासी वर्गासह नागरिकांतून देखील होतांना पाहावयास मिळत आहे.....    

💥पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकासह रेल्वे संपत्ती तसेच प्रवासी वर्गाच्या सुरक्षेसाठी खालील उपाययोजनांची आवश्यकता :- 

दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती निती सरकार यांनी लोहमार्ग पोलीस चौकीतील दोन कर्मचारी आहे त्या चौकीत ठेवून नवीन पोलिस चौकीची स्थापना रेल्वे स्थानक क्रमांक ०४ समोरील प्रवेशद्वारालगत करुन त्या नव्याने स्थापण केलेल्या पोलिस चौकीत एक सहायक पोलीस अधिकारी व १० ते १२ पोलीस कर्मचारी नेमावेत तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून रेल्वेची मालमत्ता तसेच प्रवासी सुरक्षेसह प्रवासी मालमत्तेच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे तसेच वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारांची वाढती संख्या पाहता लोकोशेड आणि रेल्वे स्थानक क्रमांक चारच्या आसपासचा तडीपार परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावा आणि या संपूर्ण परिसराभोवती सुरक्षा भिंत बांधण्यात यावी,पूर्णा रेल्वे स्थानक क्रमांक एकवरील रेल्वे तिकीट खिडकी तात्काळ उघडण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावी रेल्वे परिसरात गुन्हे घडवणाऱ्या गुन्हेगारांची ओळख प्रवासी वर्गाला पटावी या करीता त्यांची छायाचित्रे तिकीट खिडकीजवळ तसेच रेल्वे स्थानक परिसरात लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना जारी करावे,संपूर्ण रेल्वे स्थानकांवर अल्पशः दरात स्वच्छ व फिल्टर पाण्याची व्यवस्था करावी आदी महत्वपुर्ण मुद्यांवर विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांनी तात्काळ विचार करून कठोर उपाययोजना कराव्यात.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या