🌟संदेश : परभणी जिल्ह्यातील पराकोटील्या गेलेल्या बेरोजगारीचे सचित्र चित्रण स्पष्ट करणारा लेख....!


🌟अन् संदेश परभणी जिल्ह्यातील बेरोजगारी उपासमारीचा संदेश घेऊन रोजगाराच्या शोधात पुण्याला निघाला🌟

काल अचानक पनवेल गाडीने काही खाजगी कामानिमित्त पुण्याकडे निघालो होतो. गाडीमध्ये प्रचंड गर्दी होती. इतकी की, मोकळा श्वास सुद्धा घेता येतं नव्हता!

डोक्यावर गाठोडे घेऊन अनेक आया- बहिणी, त्या गाडीत बसल्या होत्या. जनरल डब्यात प्रचंड गर्दी असल्याकारणाने मी आरक्षित डब्यात दरवाजा जवळ मांडी घालून आपले बस्तान मांडले होते. समोर एक पन्नाशीतील गृहस्थ बसला होता.एकमेकांची विचारपुस झाली.तो हिंगोली जिल्ह्यातील होता. व पुण्यात कोठेतरी वाॅचमन म्हणुन कामावर होता. गाडी भन्नाट वेगाने पुण्याच्या दिशेने निघाली.पुर्णा माईचा तो विशाल तास पाहुन मनं पुलकित झालं. परभणी स्टेशन आलं. एक तरुण माझ्या जवळ येऊन बसला.त्याच्या डोकीचे अन् दाढीचे वाढलेले केस,सावळा रंग, सडपातळ बांधा त्याचा सुखलेला चेहरा... उद्विग्नता त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसतं होती.ते पाहुन मला राहावले नाही. मी त्याला विचारले," भाऊ कुठलाय?" त्याने फक्त मी परभणीचा एवढंच उत्तर दिलं. नाव ? मी पुन्हा प्रश्न केला. तो उत्तरला,"संदेश"


बहुतेक तो बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचाकडे एक बॅग व एक थैली होती. थैली पुस्तकाने गच्च भरलेली दिसत होती. थोडा वेळ असाच गेला. गाडी परळीत येऊन पोहचली. तेव्हा तो संदेश थोडा मोकळा वाटला. त्याने मला माझे नाव विचारले. मी उत्तरलो दिपक पूर्णेकर. मी त्याला म्हटलं," काय रिसर्वेशन भेटलं नाही का?" त्याने माझ्यावर नजर रोखून सांगितले, नाही मी साधे तिकीट सुद्धा काढले नाही. मी थोड अचंबित झालो. विना तिकीट अरक्षित डब्यात प्रवास? मला परत राहावले नाही मी त्याचे शिक्षण व आता कुठं जात आहे याची विचारपुस केली. तेव्हा तो म्हणाला," मी डबल एम.ए केले आहे. ५-६ वर्ष नौकरीसाठी प्रयत्न केले पण काही यश आले नाही. घरची परिस्थिती बेताची असल्याने आता घरच्यांच्या जीवावर राहणं आता मनाला पटतं नाही.स्व:ताचीच आता लाज  वाटते म्हणून पुण्यात जाऊन काही जॉब करायचा व स्पर्धा परिक्षा करण्याचा मानस त्याने माझ्यापुढे व्यक्त केला."

त्याचे ते शब्द ऐकून काळजावर सुई बोचल्यासारखे वाटले.मी त्याला विचारले," एकाच वेळी जॉब आणि स्पर्धा परिक्षा कसं होईल.?" त्याने होईल की असे उत्तर दिले. तेव्हा असमाधानाचा भाव त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होता. त्याला मी विचारले की, "जर आता टी. सी आला तर तू त्याला काय  म्हणणार?" यावर तो म्हटला," मला जे काही बोलायचं ते बोलेल मी. मी थोडा वेळ तसाच शांत बसलो. गाडीने आता बराच वेग धरला होता.

तितक्यात आरक्षित डब्यातून जागेवर बसण्यावरून दोन व्यक्तीमध्ये प्रचंड भांडण होत होते. संपुर्ण डब्यामध्ये त्यांचा  गदारोळ ऐकू येतं होता. तितक्यात टी.सी. आला व त्याने तो गोंधळ थांबवला. मग एक-एक करुन तो डबा चेकिंग करत आमच्या सामोरं आला. मी उठून त्याला माझ्या कडील जनरलचे तिकीट दाखवले तेव्हा तो म्हणाला," ये तो जनरल का है, फाईन लगेगा!" मी त्याला विनवणी करुन पुढील स्टेशनवर जनरल डब्यात जातो असे कळवले. तो शांत झाला. मग त्याने आजुन बऱ्याच जणांना तिकीट विचारले बऱ्याच फुकट्या प्रवाशाकडून दंड आकारला. शेवटी त्याने संदेशला तिकीट विचारले. मांडीवर घेतलेली बॅग हातात घेऊन तो उभा टाकला. रेल्वे लातूर स्टेशनवर थांबली होती. त्या दोघांचे संभाषण सुरू झाले होते. टी.सी," कहा जाना हैं?"

तो,"पुणे."

टी.सी," टिकट बताओ." 

तो," सर नही निकाला." 

टी.सी संतापात येऊन म्हणाला," टिकिट क्यूं नही निकाला घर की गाडी है क्या?" 

तेव्हा तो काहीच बोलला नाही. तो टी.सी म्हणाला,"कहा से बैठे हो?"

तो,"सर परभणी से."

टी.सी. म्हणाला,"500 रू. फाईन भरना पडेगा!" 

ते ऐकून संदेश म्हणाला," सर, मै बहुत पढा लिखा पर कहा पर भी नौकरी नही लगी अब पुणा जा रहा हुं काम के लिये मेरे पास इस कागजात और किताब के सिवा कुच्छ भी नहीं हैं साहब तो त्याची थैली दाखवत म्हणाला. त्याची ती फाईल टी.सी ने पूर्णपणे निरखून पहिली अन् फाईल बंद करून त्याचाकडे पाहून हलकेसे हास्य देऊन तो काहीच न बोलता पुढे निघून गेला. टी.सी ची ती पाठमोरी आकृती मला बरेच काही सांगून गेली.अन् तो संदेश त्या सारखे लाखों संदेश आजही जीवनात संघर्ष करत आहेत याची मनाला प्रचिती आली.संदेश तु खुप मोठा हो हीच सदिच्छा...

लाखों बेरोजगार संदेश सारख्या तरूणांना एकच सांगण आहे की,खचु नका,आपला दिवस नक्कीच येणार आहे.

- दिपक पुर्णेकर.✍️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या